इंद्रधनु प्रीमियर लीगच्या स्पर्धेत दुर्वा स्पोर्ट्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:20+5:302021-04-11T04:31:20+5:30

दाभोळ : इंद्रधनु स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट प्रीमियर लीगच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेत ‘दुर्वा ...

Durva Sports wins the Rainbow Premier League | इंद्रधनु प्रीमियर लीगच्या स्पर्धेत दुर्वा स्पोर्ट्स विजयी

इंद्रधनु प्रीमियर लीगच्या स्पर्धेत दुर्वा स्पोर्ट्स विजयी

दाभोळ : इंद्रधनु स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट प्रीमियर लीगच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेत ‘दुर्वा स्पोर्ट्स आणि शौर्य ट्राॅफी’ या संघाने विजेतेपद पटकावले; तसेच ‘सचिन स्टार’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एन. एस लायझनिंग ॲण्ड डेव्हलपमेंट या संघाने तृतीय क्रमांक तर ए. एस. फायटर या संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोरोना काळातील निर्बंधांचे पालन करत दाभोळ ग्रामपंचायतीच्या मैदानावर सांगता झाली.

स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अभिजीत दाभोळकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनुज मोरे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून तनिष्क नाटेकर, सामनावीर म्हणून सागर गोठणकर तर मालिकावीर म्हणून प्रणय वतारी यांना सन्मानित करण्यात आले. बक्षीस समारंभाला दाभोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदय जावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुरोंडी जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष सुहास तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य समित भाटकर, दादू मुरमुरे तसेच मंगेश तांबट, योगेश सुर्वे, मुकेश भाटकर उपस्थित होते. स्पर्धेचे समालाेचन अक्षय मयेकर आणि प्रथमेश खोत यांनी केले.

Web Title: Durva Sports wins the Rainbow Premier League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.