हातपाटी परवान्याची प्रतीक्षा संपुष्टात
By Admin | Updated: November 11, 2015 23:47 IST2015-11-11T21:31:11+5:302015-11-11T23:47:24+5:30
जिल्हा प्रशासनाकडून परवाने देण्यात येणार आहेत. यासाठी प्रस्ताव मागवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

हातपाटी परवान्याची प्रतीक्षा संपुष्टात
रत्नागिरी : जिल्ह्यातील हातपाटी वाळू व्यावसायिकांची उत्खननासाठीच्या परवान्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. खाडीपात्रातील डुबी, हातपाटी उत्खननासाठी मेरिटाईम बोर्डाकडून साठा निश्चित करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाकडून परवाने देण्यात येणार आहेत. यासाठी प्रस्ताव मागवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. हे परवाने आता वर्षासाठी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील खाडीपात्रातील सागरी किनारपट्टीच्या क्षेत्रात नौकानयन मार्ग सुकर करण्यासाठी वाळू उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवाने देण्यात येणार आहेत. खाड्यांतील हातपाटी वाळू उत्खननासाठी साठा निश्चित करण्याचे अधिकार मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यात केवळ एका महिन्यासाठी परवाने देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यानंतर आॅक्टोबरच्या परवान्याची प्रतीक्षा हातपाटी व्यावसायिकांकडून करण्यात येत होती.
अखेर नोव्हेंबरच्या सुरुवातीला मेरिटाईम बोर्डाकडून जिल्ह्यातील हातपाटी उत्खननासाठी खाडीपात्रातील वाळूसाठा मेरिटाईम बोर्डाकडून निश्चित करण्यात आला आहे. बोर्डाच्या जलसर्वेक्षणानुसार आंजर्ला खाडी, जोग नदी, दाभोळ खाडी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, जयगड खाडी व काळबादेवी खाडीतील हातपाटी व डुबीद्वारे पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खननासाठी साठा निश्चित करण्यात आला आहे. या रेतीगटांचा सविस्तर तपशील व विहीत नमुन्यातील अर्ज तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे उपलब्ध आहे. तसेच हातपाटी व डुबी रेती गटाचा तपशील ६६६.१ं३ल्लँ्र१्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)