मुसळधार पावसामुळे खेडमधील सहा धरणे फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:40+5:302021-06-23T04:21:40+5:30

खेड : तालुक्यातील सात धरणांपैकी सहा धरणे शंभर टक्के भरून वाहू लागली आहेत. गेल्या आठ दिवसांत धरण क्षेत्रात पडलेल्या ...

Due to torrential rains, six dams in Khed are full | मुसळधार पावसामुळे खेडमधील सहा धरणे फुल्ल

मुसळधार पावसामुळे खेडमधील सहा धरणे फुल्ल

Next

खेड : तालुक्यातील सात धरणांपैकी सहा धरणे शंभर टक्के भरून वाहू लागली आहेत. गेल्या आठ दिवसांत धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने यावर्षी जून महिन्याच्या सतरा दिवसांतच सहा धरणे तुडुंब भरली आहेत, तर एक धरण ६० टक्के भरले आहे.

तालुक्यात पाटबंधारे विभागाची शिरवली, शेलडी, कोंडीवली, पिंपळवाडी, तळवट, कुरवळ व नातूवाडी, असे एकूण सात प्रकल्प पूर्ण भरले आहेत. यापैकी नातूवाडी मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित सर्व सहा धरणे शंभर टक्के भरली आहेत. यामध्ये पिंपळवाडी धरणाची एकूण क्षमता १८.८९५ दलघमी असून उपयुक्त पाणी साठा १७.९४७ दलघमी आहे.

यावर्षी जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत ९८४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी याच कालावधीत ४४९ मिलिमीटर एवढा पाऊस या धरण क्षेत्रात पडला होता, तर ४७.४९ टक्के धरण भरले होते. सद्य:स्थितीत या धरणातून ०.८७ क्युमेक्स एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिरवली धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ३.३७५ दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा २.९७८

दलघमी एवढा आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंत ६६० मिलिमीटर एवढा पाऊस पडला होता़ मात्र, यावर्षी ८९३ मिलिमीटर पाऊस या धरणाच्या परिसरात पडला आहे. गतवर्षी हे धरण ७६ टक्के भरले होते. कोंडीवली धरणाची एकूण क्षमता ३.३६६ दलघमी एवढी असून, उपयुक्त पाणीसाठा २.९६१ दलघमी आहे. यावर्षी धरण क्षेत्रात ७३१ मिलिमीटर पाऊस पडला असून, गतवर्षी ५०५ मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षी १७ जूनपर्यंत हे धरण ५० टक्के भरले होते. या धरणातून दररोज ०.५० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तळवट धरण ४.८५० दलघमी क्षमतेचे असून, या धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४.६७७ दलघमी आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंतच्या कालावधीत ८५ टक्के धरण भरले होते. यावर्षी या धरण क्षेत्रात ८०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी हेच प्रमाण ५४८ मिलिमीटर होते. या धरणातून सध्या ०.६० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुरवळ धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता २.७१० दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा २.५९० दलघमी एवढा आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंत ४४९ मिलिमीटर एवढा पाऊस पडला होता़ मात्र, यावर्षी ९८४ मिलीमीटर पाऊस या धरणाच्या परिसरात पडला आहे. गतवर्षी हे धरण ४७ टक्के भरले होते. शेल्डी प्रकल्पाची एकूण पाणीसाठ्याची क्षमता १.७४८ दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा १.६९० दलघमी एवढा आहे. गतवर्षी जून १७ पर्यंत ५४ टक्के धरण भरले होते़ मात्र, यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या ९५२ मिलिमीटर विक्रमी पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने १६ मेपासूनच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून, जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मात्र, सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या नातूनगर मध्यम प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. नातूनगर धरण परिसरात यावर्षी आतापर्यंत ८६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे़ गतवर्षी याच काळात ६७२ मिलिमीटर पर्जन्यमान झाले होते. या धरणाची एकूण क्षमता २८.०८ दलघमी एवढी असून, उपयुक्त पाणीसाठा २७.२३० दलघमी आहे. सद्य:स्थितीत या धरणात ८६.११ मिलिमीटर पाणी पातळी असून, धरणात १६.३३४ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंत हे धरण ५२.५० टक्के भरले होते.

Web Title: Due to torrential rains, six dams in Khed are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.