शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खाेळंबा, प्रवाशांचे हाल

By अरुण आडिवरेकर | Updated: June 5, 2023 17:56 IST

या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या

रत्नागिरी : रेल्वे मार्गालगत जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर बाजूच्या रेल्वे बाेगद्यामध्ये पसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सहा ते सात एक्स्प्रेस गाड्यांचा खाेळंबा झाला. ही घटना साेमवारी (५ जून) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजापूर नजीकच्या निवसर स्थानकाजवळ घडली. दरम्यान, दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.कोकण रेल्वे मार्गावरील निवसर स्थानकानजीक असलेल्या बाेगद्याजवळ कचरा जाळण्यात आला. या कचऱ्याचा धूर जवळच असलेल्या रेल्वेच्या बाेगद्यामध्ये पसरला. याचदरम्यान मंगला एक्स्प्रेस गाेव्याच्या दिशेने जात होती. धुराची झळ बसल्याने मंगला एक्स्प्रेससह त्याचवेळी त्या भागातून मुंबईच्या दिशेने जाणारी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसही अडकून पडली हाेती.या दोन गाड्यांच्या पाठोपाठ दोन्ही बाजूंनी येणाऱ्या अन्य पाच एक्स्प्रेस गाड्यांना याचा फटका बसला. बाेगद्यातील धुराचे प्रमाण कमी झाल्यानंतर पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान गाड्या मार्गस्थ झाल्या. ताेपर्यंत प्रवाशांना हाल साेसावे लागले. निवसरमधील या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या.या गाड्यांना बसला फटकाएर्नाकुलम-एलटीटी दुरंतो एक्स्प्रेस, मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस, मुंबईकडे जाणारी मरूसागर एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, अमृतसर-कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे