शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रमजानमुळे आखाती देशात हापूस आंब्याला वाढती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:12 IST

हापूस बाजारात; दर स्थिर राहण्याची अपेक्षा

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला असला, तरी वाशीमध्ये कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी दाखल होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान मास दि. १२ मार्चपासून सुरू होत असल्याने आखाती देशातून आंब्यासाठी मागणी वाढत आहे. त्यामुळे दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. सोमवारी वाशी मार्केटमध्ये १८ हजार ५९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यात कोकणातून १३ हजार ५३२, तर अन्य राज्यांतील ४,५२७ पेट्यांचा समावेश आहे.अवकाळी पाऊस, नीचतम तापमान, ढगाळ हवामानामुळे आंब्यावर कीडरोड, बुरशीसह तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा आंबा पीक बंपर येण्याच्या आशेवर पाणी फिरले. नैसर्गिक दुष्टचक्रातून वाचलेला आंबा डिसेंबर, जानेवारीपासून विक्रीस येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाच-दहा हजार पेटी दररोज वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जात आहे. मात्र, त्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक आंबा कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील आहे. उर्वरित ४० ते ४५ टक्के आंबा कोकणातील असून, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंबा अधिक आहे.

वाशी मार्केटमध्ये आलेल्या आंब्यापैकी ७० ते ७५ टक्के आंबा आखाती प्रदेशात पाठविला जातो. उर्वरित पाच टक्के मुंबईत, तर उर्वरित २० टक्के अन्य देशांत व राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो. मुस्लिम देशामध्ये रमजानमुळे फळांना वाढती मागणी असते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच रमजान असल्याने आंब्याला शेवटपर्यंत मागणी चांगली राहणार असल्याने दरही बऱ्यापैकी स्थिर राहणार असल्याचे विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

  • आंबा लागवड क्षेत्र - ६६, ४३३ हेक्टर
  • वार्षिक उत्पादन - एक ते सव्वा लाख टन
  • परदेशी विक्री - ६० हजार टन
  • स्थानिक विक्री - २० हजार टन
  • कॅनिग साठी - २० हजार टन
  • वार्षिक उलाढाल ७०० ते ८०० कोटी

दर न परवडणारासध्या वाशी मार्केटमध्ये आंबा पेटीला दोन हजार ते पाच हजार रुपये दर मिळत आहे. खत, कीटकनाशके, वाहतूक खर्च, मजुरी, काढणी, पिंजरा (खोका) या सर्व बाबींचा विचार करता पेटीला मिळणारा दर परवडत नसल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणी ते विक्रीसाठी पाठवेपर्यंत प्रचंड खर्च येतो. त्यामुळे आंब्याचे दर टिकून राहणे गरजेचे आहे. दर टिकले तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च काहीअंशी भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाRamadanरमजान