शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:18 IST

ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत, प्रतिबंधात्मक फवारणीसाठी केलेला खर्च वायापाणी साचल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका सध्या ६० टक्के पालवी ४० टक्के मोहोर अशी स्थितीबुरशीजन्य रोग व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

रत्नागिरी : ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे आंबा पिक धोक्यात आहे.

पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. पाऊस थांबला तरी ढगाळ हवामान असल्यामुळे कलमांच्या मोहोरावर बुरशीजन्य रोग, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून थंडी गायब असल्याने उष्मा जाणवत होता. रत्नागिरी वगळता जिल्ह्यात सोमवारी अन्य ठिकाणी पाऊस पडला. मात्र, सोमवारी रात्रीपासून रत्नागिरीतही पाऊस सुरू झाला आहे. सरीवर पाऊस कोसळत असला तरी ओलावा वाळण्यापूर्वीच पाऊस पडत आहे. त्यामुळे मोहोर चांगलाच भिजला आहे.

काही ठिकाणी भिजल्यामुळे मोहोर वाकला आहे. पावसाचे पाणी मोहोरात साचल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी फळधारणा झाली आहे. कणी, वाटण्याएवढी फळधारणा झाली असून, पावसामुळे आंबा पिक धोक्यात आहे.

सध्या ६० टक्के पालवी ४० टक्के मोहोर अशी स्थिती आहे. सध्या तुडतुड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे व पावसामुळे बुरशीजन्य रोग व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.हवामानात दरवर्षी होणाऱ्या बदलामुळे आंबापिकावर परिणाम होत आहे. गतवर्षी आंबा एकाच वेळी बाजारात आला. शिवाय त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस बाजारात आल्याने दर कोसळले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

यावर्षी सुरूवातीपासूनच पालवीचे प्रमाण अधिक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे थंडी उशिरा सुरू झाली. डिसेंबर सुरू झाला तरी मोहोर प्रक्रिया किरकोळ आहे. याशिवाय हवामानातील बदलामुळे, थंडी गायब असल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.

फयान वादळानंतर सलग चार - पाच दिवस पाऊस झाला होता. त्यामुळे ओखी वादळ पुढे सरकले असले तरी पाऊस अजून किती दिवस लागेल, याबाबत आताच सांगणे शक्य होणार नाही. मात्र, पावसामुळे आंबापीक धोक्यात आले आहे.

अजून पाऊस सुरूच राहिला तर शेतकरीवर्गाला फार मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊस थांबला तरी शेतकऱ्यांना कीड, रोग, बुरशी नष्ट करण्यासाठी उच्चत्तम प्रतीची बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी लागणार आहे.

 

दरवर्षी हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाली. पालवीचे प्रमाणच सर्वाधिक आहे. परंतु किरकोळ मोहोर प्रक्रिया सुरू झाली. ओखी वादळामुळे वादळी वारे झाले नाहीत, तर पाऊस मात्र बऱ्यापैकी झाला आहे. पावसाचे पाणी मोहोरात गेल्यामुळे मोहोर कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. झालेली फळधारणाही धोक्यात आली आहे. ढगाळ हवामानामुळे बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीड, बुरशीपासून संरक्षणासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहोर संरक्षणासाठी केलेल्या फवारणीचा खर्च मात्र वाया गेला आहे.- टी. एस. घवाळी, शेतकरी, रत्नागिरी.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरीfruitsफळे