पर्यटकांअभावी खाेरनिनकाे धरण परिसर ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:52+5:302021-07-20T04:21:52+5:30
अनिल कासारे / लांजा : तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे नसल्याने पावसाळी पर्यटनाला मर्यादा येत आहेत. मात्र, माचाळ हे ...

पर्यटकांअभावी खाेरनिनकाे धरण परिसर ओस
अनिल कासारे / लांजा : तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे नसल्याने पावसाळी पर्यटनाला मर्यादा येत आहेत. मात्र, माचाळ हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने नावारूपाला येत असल्याने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यातच आता खाेरनिनकाे येथील धरणाने अनेकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. काेराेनामुळे या ठिकाणीही पर्यटकांनी आता पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यात पावसाळी पर्यटनाला चालना मिळणे शक्य असल्याचे दिसत आहे. त्यासाठी तालुक्यात छाेटे - छाेटे धबधबे तयार करून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले आणि पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली. अनेक ठिकाणी असलेले धबधबे पर्यटकाशिवाय ओस पडले आहेत. पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे आपल्या नजरेत कैद करण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्यात या धबधब्यावर हजेरी लावतात. त्यामुळे आजूबाजूला असलेले छोटे - मोठे व्यावसायिकांची या पर्यटनावर रोजी - रोटी अवलंबून असते. लांजा तालुक्यातील खोरनिनको मानवनिर्मित असलेले धरण त्या धरणाला एका बाजूला काढण्यात आलेला सांडवा हा पावसाळ्यात धरण भरल्यानंतर ओसंडून वाहू लागल्यानंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्यटक येथे हजेरी लावतात आणि आनंद घेतात. मानवनिर्मित या धबधब्यावर पर्यटक हल्ली मोठ्या संख्येने हजेरी लावत होते. काेराेनामुळे हे ठिकाणही आता ओस पडले आहे.
----------------------------------
पर्यटकच नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान
काेराेनामुळे पर्यटनस्थळे बंदी घातल्याने खोरनिनको धरणाकडे येणारे पर्यटक येथे येत नसल्याने लांजा, कोर्ले, भांबेड, प्रभानवल्ली, खोरनिनको येथील छोटे - छोटे असलेले व्यापारी यांचे पर्यटक नसल्याने नुकसान झाले आहे. या रस्त्यावर असलेले चहा टपऱ्या, छोटी - छोटे हाॅटेल इतर दुकाने आहेत. पावसाळ्यात या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह हाेताे. सध्या पर्यटकच नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.