संततधार पावसामुळे तिडे मार्गावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:24+5:302021-07-20T04:22:24+5:30

मंडणगड : शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यात दोन घरांचे सुमारे २१ हजार रूपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर तिडे, ...

Due to incessant rains, traffic on Tide route was closed | संततधार पावसामुळे तिडे मार्गावरील वाहतूक बंद

संततधार पावसामुळे तिडे मार्गावरील वाहतूक बंद

मंडणगड : शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तालुक्यात दोन घरांचे सुमारे २१ हजार रूपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर तिडे, तळेघर, लाटवण परिसरातील वाहतूक रविवार व सोमवारी काही कालावधीकरिता बंद ठेवण्यात आली होती.

शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवार व सोमवारीही सतत कोसळत असल्यामुळे टावली येथील पांडुरंग दौलत रक्ते यांच्या घराचे ११,४५० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर अडखळ येथील संतोष कावणकर यांच्या पडवीची पडझड झाल्याने ९६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी तिडे - तळेघर रस्त्यावर पाणी आल्याने तसेच टाकेडे मार्गावर व दाभट फरशीवरून पाणी गेल्याने विन्हे-लाटवण रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

-----------------------------

मंडणगड तालुक्यात मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे तिडे मार्गावर पाणी आले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Web Title: Due to incessant rains, traffic on Tide route was closed