खेडमध्ये दारूचा महापूर

By Admin | Updated: October 15, 2015 00:46 IST2015-10-14T23:43:38+5:302015-10-15T00:46:14+5:30

पोलिसांचीच कारवाई : उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

Drunkenness in the village | खेडमध्ये दारूचा महापूर

खेडमध्ये दारूचा महापूर

खेड : मुंबईच्या मालवणी भागात झालेल्या दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, खेड शहरातील मोक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात आजही गावठी दारूचे अड्डे तेजीत सुरू आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच हे धंंदे विनासायास सुरू असतात. मात्र, त्रासलेल्या महिलावर्गाने हे धंदे नेस्तनाबूत करण्याची मागणी केली आहे.
मालवणी दारूकांडानंतर संबंध महाराष्ट्रात गावठी दारूच्या अड्ड्यांवर मोठे धाडसत्र सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडीत मोठमोठी घबाडदेखील सापडली आहेत. दारूच्या अड्ड्यांचे लोण मोठ्या शहरात आहे; असे नव्हे, तर खेड शहर आणि परिसरात गावठी दारूचे असे अनेक अड्डे आढळू आले आहेत. मुंबईतील या दारूकांडानंतर पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेडमधील दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या आहेत. मात्र, या धाडी मर्यादित आहेत. यातील पोलिसांनी टाकलेल्या धाडीचे प्रमाण उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीच्या प्रमाणापेक्षा मोठे आहे.तिसंगी, कुळवंडी, सुसेरी व खारी यांसारख्या ठिकाणी असणारे गावठी दारूचे अड्डे पोलिसांच्या कारवाईमुळे नेस्तनाबूत झाले आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी गावठी दारूचे अड्डे आपल्या अखत्यारीत वाचवले आहेत. मोठे अड्डे स्थानिक पातळीवर आजही सुरू असले तरी ते पोलिसांपासून काहीसे दूर आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारुधंद्यांकडे आता स्वत: लक्ष देणे आवश्यक असल्याचा सूर तालुक्यातून उमटत आहे. (प्रतिनिधी)

अड्डे कमी : उत्पादन शुल्क खात्याचे सहकार्यही कमी
पोलिसांच्या या धाडसत्रामुळे काही ठिकाणचे गाावठी दारूचे अड्डे नेस्तनाबूत झाले आहेत. मात्र, याकामी उत्पादन शुुल्क विभागाचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याबाबत काहीशी नाराजी आहे. काही गावठी हातभट्ट्यावगळता मोठमोठी दारू विक्री करणारी केंद्र ग्रामीण भागात सुरू होती. आता हे प्रमाण कमी झाले असले तरीही ते पूर्णत: कमी झालेले नाही. त्यामुळे खेड तालुक्यात अजूनही दारुभट्ट्या धगधगत आहेत. त्यावर अंकुश कधी ठेवणार? असा सवाल आता खेड तालुक्यातून केला जात आहे.

मोर्चेही दिसेनासे
खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील मोठे दारूचे अड्डे नष्ट झाले आहेत. यामुळे पोलीस स्थानकात वारंवार महिलांचे दारू बंदीबाबतचे येणारे मोर्चेदेखील आता दिसेनासे झाले आहेत.

Web Title: Drunkenness in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.