दापाेली पाेलिसांनी तयार केले साखळी चाेराचे रेखाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:00+5:302021-06-28T04:22:00+5:30

दापोली : तालुक्यातील कुंभवे येथील महिलेच्या गळ्यातील साेन्याचा सर आणि साेन्याची चेन चाेरणाऱ्या चाेरट्याचे रेखाचित्र दापाेली पोलिसांनी तयार केले ...

Drawings of chain fences made by Dapali Paelis | दापाेली पाेलिसांनी तयार केले साखळी चाेराचे रेखाचित्र

दापाेली पाेलिसांनी तयार केले साखळी चाेराचे रेखाचित्र

दापोली : तालुक्यातील कुंभवे येथील महिलेच्या गळ्यातील साेन्याचा सर आणि साेन्याची चेन चाेरणाऱ्या चाेरट्याचे रेखाचित्र दापाेली पोलिसांनी तयार केले आहे. हे रेखाचित्र पाेलिसांनी जाहीर केले असून, अशा स्वरूपाची व्यक्ती कुठेही आढळून आल्यास दापोली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुंभवे येथील संगीता विजय पाटील यांच्या गळ्यातील एक ताेळ्याचा साेन्याचा सर व अर्धा ताेळे वजनाची साेन्याची चेन चाेरट्याने चाेरून नेली हाेती. ही घटना १६ मार्च २०२१ राेजी कुंभवे गावातील हद्दीत म्हातारीचे वाकण येथे घडली हाेती. या चाेरी प्रकरणातील आराेपीला पकडण्यात पाेलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पाेलिसांनी संगीता पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाेरट्याचे रेखाचित्र तयार केले आहे. हे रेखाचित्र पाेलिसांनी जाहीर केले असून, या वर्णनाची व्यक्ती काेणाला दिसल्यास पाेलिसांशी संपर्क साधावा किंवा पाेलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. या घटनेचा अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत़

Web Title: Drawings of chain fences made by Dapali Paelis