शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती नको : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 13:30 IST

पुण्याप्रमाणे रत्नागिरी शहरातील नागरिकांनीही हेल्मेट वापरू नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी : पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. याबाबत ४ एप्रिलपर्यंत परिपत्रक निघाले नाही तर पुण्याप्रमाणे रत्नागिरी शहरातील नागरिकांनीही हेल्मेट वापरू नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त हाेत आहे. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारणी करुन जनतेची लुबाडणूक केली जात असल्याचा आराेप करण्यात येत आहे. याबाबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन भूमिका मांडली हाेती. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.  पाटील,  उपप्रादेशिक अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मंत्री सामंत यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रत्नागिरीतही निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. पुण्याच्या धर्तीवर रत्नागिरी शहरात हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करताना हेल्मेट सक्ती करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात ४ तारखेपर्यंत परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन करावे, असेही त्यांनी आदेश दिले आहेत.राज्याच्या एका जिल्ह्यात जिल्हाधिकारी असा निर्णय घेऊ शकतात आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहे त्या शहरात असा निर्णय हाेऊ शकताे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा निर्णय हाेऊ शकताे, असे मंत्री सामंत म्हणाले.पुण्यासारखे परिपत्रक काढून नागरिकांचे प्रबाेधन करण्यात येईल व सक्ती केली जाणार नसल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.मंत्री म्हणून मी सूचना दिलेल्या आहेत. याचे पालन झाले नाही तर याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल. राज्यातील एका जिल्ह्यात हेल्मेट मुक्ती मिळत असताना अधिकारी जाणीवपूर्वक रत्नागिरीतील लाेकांना त्रास देण्यासंदर्भात असा निर्णय घेत असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली जाईल, असेही मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी