शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील नाट्यगृहाचं चित्रपटगृह करू नका, नाट्यप्रेमींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:08 IST

नाट्यगृहात चुकीचा पायंडा पडायला नको

रत्नागिरी : शहरात नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवारी व रविवारी एका चित्रपटाचे शाे लावण्यात आले आहेत. मात्र, या प्रकारामुळे शहरातील नाट्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, या प्रकाराला तीव्र शब्दात विराेध केला आहे. रत्नागिरीतील देखण्या नाट्यगृहाच चित्रपटगृह करू नका, असा इशाराच नाट्यप्रेमींनी दिला आहे.रत्नागिरीतील नाट्यगृहाचे नूतनीकरण केल्यानंतर या नाट्यगृहाची गणना राज्यातील उत्तम नाट्यगृहांमध्ये करण्यात येत आहे. नाट्यगृहाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना विविध नाटके पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचे सादरीकरणही याठिकाणी करण्यात आले. त्यालाही नाट्यरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, याच नाट्यगृहात एका संस्थेने शनिवार आणि रविवार असे चित्रपटाचे शाे आयाेजित केले आहेत.हा प्रकार शहरातील नाट्यप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी या शाेंना विराेध केला आहे. नाट्यगृहात चित्रपट दाखवले गेले तर सिनेमागृह कशासाठी? नाटकांऐवजी चित्रपटच दाखवले जातील, असेही नाट्यप्रेमींचे म्हणणे आहे. नाट्यगृह हे नाटकांसाठी असावे, अशी मागणीही नाट्यप्रेमींनी केली आहे.नाट्यगृहात चुकीचा पायंडा पडायला नकोशहरातील नाट्यगृह हे नाटकांसाठी असले पाहिजे. त्याठिकाणी सिनेमा दाखवणे हे अत्यंत चुकीचे आहे. एका संस्थेला ही संधी दिल्यास अन्य संस्थाही यासाठी मागणी करतील. त्यामुळे चुकीचा पायंडा पडायला नकाे, असे एका जाणकार नाट्यप्रेमीने नाव न छापण्याच्या अटीवर बाेलताना सांगितले.अन्यत्र कोठेही घ्यासिंधुदुर्गात या चित्रपटाचे शाळा, महाविद्यालयांमध्ये शाे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतही शाळा, महाविद्यालय किंवा एखाद्या मैदानावर शाेचे आयाेजन करावे. शहरातील बंद सिनेमागृहाचाही वापर करता येऊ शकताे, केवळ नाट्यगृहासाठी अट्टाहास का? असा प्रश्नही नाट्यप्रेमींकडून केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri theater fans protest movie screenings at the drama theater.

Web Summary : Ratnagiri's theater lovers are opposing film screenings at Swatantryaveer Savarkar Natyagruha, a drama theater. They argue that the theater should be exclusively for plays, fearing it might turn into a cinema hall. They suggest alternative venues for film screenings.