शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांकडून पोलिसांनी करून घेतले घरगुती काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 23:16 IST

जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी पळाल्याच्या घटनेला आठ दिवस होत असतानाच रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचा वापर पोलिसाचे घरगुती काम करून घेण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

रत्नागिरी : जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी पळाल्याच्या घटनेला आठ दिवस होत असतानाच रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांचा वापर पोलिसाचे सामान हलवण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. कैद्यांना अशा पद्धतीने घरगुती कामाला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांनी दिली आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या सुरक्षेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण आठ दिवसांपूर्वी इथून एक कैदी पळून गेला होता आणि आता आज बुधवारी या विशेष कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी घरकामासासाठी जुंपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कारागृहातील एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान ट्रकमध्ये भरण्यासाठी कारागृहातील काही कैदी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जेल कर्मचारी वसाहती बाहेर आणले होते. मोकळ्या वातावरणात आलेल्या या कैद्यांना आपण कैदी असल्याचा विसरच पडला होता, तर वर्दीवर असलेले जेल पोलीस मुख्य रस्त्यावर ट्रक उभा करून सहकारी कर्मचाऱ्याच्या घरातील सामान त्या कैद्यांकरवी ट्रक मध्ये भरून घेत असताना अनेकांनी पाहिलं.

आठ दिवसांपूर्वी याच कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला रुपेश कुंभार नामक आरोपी जेल पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेला होता, या प्रकारानंतर जेल मधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता, या घटनेला 8 दिवस होत नाहीत तोच एका कर्मचाऱ्याच्या घरातील सामान हलविण्याकरीता चक्क कारागृहातील कैद्यांचा हमाल म्हणून वापर करण्यात आला, त्यामुळे जेल प्रशासन नेमकं करतंय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू अशी प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक आर आर देशमुख यांनी दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस