शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

चिपळुणात कुत्र्याने केले ११ जणांना जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:09 IST

dogs, chiplun, ratnagirinews चिपळूण शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देचिपळुणात कुत्र्याने केले ११ जणांना जखमी

चिपळूण : शहरात पुन्हा एकदा भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील काविळतळी परिसरात शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल ११ लोकांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपालिकेने तात्काळ भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव नेहमीचा शिरस्ता राहिला आहे. शहराच्या विविध भागात झुंडीने आढळणारे श्वान काही काळानंतर पिसाळतात आणि समोर असेल त्याला चावा घेऊन जखमी करतात. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे शहरात श्वानांनी अक्षरश: थैमान घातले होते.

शालेय मुलांसह महिला आणि जेष्ठ नागरिकांनाही या श्वानांनी रक्तबंबाळ केले होते. त्यावेळी शहरात मोठी ओरड झाली आणि पालिकेने भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबवली होती. त्यानंतर शहरात श्वानांचा उपद्रव कमी झाला होता.शहरात अनेक भागात अक्षरश: झुंडीने श्वान आढळत आहेत. शुक्रवारी सकाळी काविळतळी परिसरात अशाच झुंडीतील श्वानाने थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक असे तब्बल ११ लोकांना चावा घेऊन त्याने जखमी केले. हा श्वान इतका जबरदस्त पिसाळलेला होता की, चार चाकी, दुचाकी आणि रिक्षावरदेखील त्याने हल्ला चढवला. नगर परिषदेने अशा श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :dogकुत्राChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी