शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का?, नीलेश राणे यांचा सामंत समर्थकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:02 IST

रत्नागिरीतील महामार्गच का रखडला

रत्नागिरी : कोणत्याही व्यक्तीवर नाही, पण व्यवस्थेवर किंवा विषयावर चर्चा झालीच पाहिजे, ती रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्न माजी खासदार नीलेश राणे यांनी सामंत समर्थकांना केला आहे. रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का, असा प्रश्न करत त्यांनी सामान्य माणसावर हात उगारलेला आपण खपवून घेणार नाही, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.रत्नागिरीतील खड्ड्यांबाबत बोलावण्यात आलेली सभा सामंत समर्थकांनी उधळून लावली. याबाबत नीलेश राणे यांनी समाज माध्यमावरून कडक टीका केली आहे. याबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी सामंत समर्थकांवर टीका करतानाच लोकांच्या प्रश्नांसाठी पुढे येण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. मात्र, ही सभा होण्यापूर्वीच उधळण्यात आली. मुद्दे मांडणाऱ्यांना बोलूच न देता त्यांना धमकावण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली. या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून, रत्नागिरीला १९९० मधील बिहार करायचे आहे का, असा प्रश्न राणे यांनी केला आहे.सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती, त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते. तरीही त्यांना बोलू दिले नाही. सभेत जे ५०-६० जण घुसले त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली काही माणसे होती. अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकावयाचा, त्यांना घाबरावयाचा अधिकार कोणी दिला. यावर पोलीस कोणती कारवाई करणार आहेत, असा प्रश्नही राणे यांनी केला आहे.

रत्नागिरीतील महामार्गच का रखडलायाच सभेत घुसलेल्यांनी महामार्गाचा मुद्दा मांडला. त्याचा समाचार नीलेश राणे यांनी घेतला. महामार्गाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक लावा आणि महामार्गाचा केवळ रत्नागिरीचाच भाग आतापर्यंत अपूर्ण का राहिला याचाही हिशेब द्या. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही, पण आमच्या नेत्यांवर टीका केलीत तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे Uday Samantउदय सामंत