शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मला मारूनच वाद संपवायचा आहे का, आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना थेट सवाल

By संदीप बांद्रे | Updated: February 17, 2024 15:17 IST

चिपळूण : भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणे यांनी उघड केला आहे. विरोधकांना संपवून टाकण्याचे त्यांचे धोरण आहे. ...

चिपळूण : भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणे यांनी उघड केला आहे. विरोधकांना संपवून टाकण्याचे त्यांचे धोरण आहे. तेच निलेश राणेंनी गुहागरच्या सभेत केले. मला मारूनच त्यांना हा वाद संपवायचा आहे का, असा सवाल शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आपल्याला संपवणे तितके सोपे नाही. माझा कार्यकर्ताच छातीचा कोट करून तुमच्याबरोबर संघर्ष करेल हे लक्षात ठेवा. आता जबाबदारी गृहविभागाची व येथील पोलिसांची आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास मी थेट रस्त्यावर उतरून न्याय मागेन, असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.       माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी येथे जोरदार राडा झाला. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव म्हणाले, निलेश राणे हे राडा करण्यासाठीच चिपळूणात आले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या गोष्टी उघड होतील. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या डिकीमध्ये खोके भरून दगडी आणल्या होत्या. मिरवणुकीतील सहभागी लोकही बाहेरगावचे होते. त्यांनीच दगडफेक करायला लावली. गाड्या फोडा असे निलेश राणे स्वतः सांगत होते हे देखील फुटेजमध्ये दिसत आहे. पूर्वनियोजित कट करूनच ते चिपळूणात आल्याचा आरोप जाधव यांनी केला.    प्रत्यक्षात पोलिसांनी महामार्गावर स्वागत करण्याची परवानगी दिलीच कशी आणि कोणत्या नियमाखाली दिली. अनेकवेळा सांगूनही पोलिसांनी माझे ऐकले नाही. हा हल्ला होणार हे पोलिसांना माहीत होते. तरी देखील त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन माझ्याच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. मुदतबाह्य अश्रूधुर असलेल्या नळकांड्या जाणूनबुजून आमच्याच बाजूला फोडल्या. निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना धुमशान घालण्यासाठी मोकळे सोडले. पोलिसांनी जर महामार्गावर परवानगीच दिली नसती किंवा त्यांना थेट सभेच्या ठिकाणी पाठवून दिले असते, तर काहीच घडले नसते. त्यामुळे पोलीस देखील जबाबदार आहेत.निलेश राणेंच्या सभेबद्दल आमदार जाधव म्हणाले, गुहागर मधील त्यांची सभा बघून लाज वाटली. त्यांच्या प्रत्येक वाक्यात फक्त शिव्या आणि शिव्याच होत्या. आई-बहिनीवरून जाहीर सभेत शिवीगाळ करतात, हीच त्यांची संस्कृती. निलेश राणेंच्या रूपाने भाजपचा खरा चेहरा दिसून लागला असून माजी आमदार विनय नातू यांच्या सारखी व्यक्ती व्यासपीठावर बसून टाळ्या वाजवते. हे देखील तितकेच निंदणीय आहे. निलेश राणे सभेत सतत मला संपविण्याची भाषा करीत होते. याचाच अर्थ मी जे बोलत होतो की मला धमक्या येत आहेत. ते निलेश राणे यांनी सत्य ठरवले आहे. मला मारण्याची जबाबदारी देखील निलेश राणे यांनी घेतली आहे. हे देखील त्यांनी आपल्या भाषणातुन स्पष्ट केले आहे. पण मला संपवणे तितकेसे सोपे नव्हे. असा पुनरूच्चारही जाधव यांनी केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवNilesh Raneनिलेश राणे