शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज हवंय ना ? आता बँकेतच मिळेल सातबारा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 20:01 IST

bankingsector, ratnagirinews विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही किंवा अर्जासोबत सातबारा जोडण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने प्रमुख २३ बँकांशी सामंजस्य करार केल्याने या बँकांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देकर्ज हवंय ना ? आता बँकेतच मिळेल सातबारा उताराजमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून २३ बँकांशी सामंजस्य करार

रत्नागिरी : विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही किंवा अर्जासोबत सातबारा जोडण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने प्रमुख २३ बँकांशी सामंजस्य करार केल्याने या बँकांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांना किंवा जमीनधारकांना कुठलेही कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा सादर करणे गरजेचे असते. मात्र, आता राज्यात सर्वत्र सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. राज्यातील २ कोटी ५० लाख ६० हजार सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात २० लाख ८७ हजार १२३ सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाले आहे. राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाल्याने हे संगणकीकृत अभिलेख सर्व बँका व वित्तीय संस्थांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला आहे.जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने बँकिंग पोर्टल (ँ३३स्र२://ॅ2ु.ेंँुंँ४े्र.ॅङ्म५.्रल्ल) विकसित केले आहे. त्याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे सातबारा, खाते उतारे व ऑनलाइनला नोंदविलेले डिजिटल स्वाक्षरीतील उतारे, फेरफार बँक अथवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रुपये नक्कल शुल्क भरून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी आजपर्यंत २३ बँकांनी सामंजस्य करार केले आहेत.या सुविधेचा लाभ आता कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सातबारा उताराधारकाला मिळणार आहे. यापुढे बँकांचे किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज काढताना प्रस्तावासोबत सातबारा उतारा जोडण्याची गरज नाही. हा संगणकीकृत सातबारा उतारा बँकेकडे आपोआप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकांचा खूप मोठा त्रास कमी होणार आहे.करार केलेल्या २३ बँकामहाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, गोंदिया, धुळे नंदुरबार, लातूर, औरंगाबाद, नगर, बुलडाणा, परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, कोटक महिंद्रा बँक, एच. डी. एफ. सी. बँक, आय. सी. आय. सी. आय., स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, आय. डी. बी. आय. बँँक.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रRatnagiriरत्नागिरी