चायनीज खाताय की पाेटांच्या आजारांना निमंत्रण देताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:43+5:302021-09-22T04:35:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यामुळे त्याची ...

चायनीज खाताय की पाेटांच्या आजारांना निमंत्रण देताय?
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यामुळे त्याची लज्जत वाढविण्यासाठी त्यात अजिनोमोटो हा चायनीज पदार्थ मिसळला जातो. सध्या चायनीज पदार्थांचे वेड मुलांनाच नव्हे तर सर्व वयोगटांतील व्यक्तींना लागले आहे. मात्र, चायनीज खाणे आरोग्याला अपायकारक ठरत असून पोटाच्या आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे.
चायनीज खाण्याचे वेड वाढले आहे; परंतु यात चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोच्या अर्थात सोडियम सॉल्ट ऑफ ग्लुटॅमिक ॲसिड याच्या अतिसेवनामुळे आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीवर दुष्परिणाम परिणाम होतो. शरीरात अतिप्रमाणात अजिनोमोटो हे फूड ॲडक्टीव्ह गेल्यास पॅनिक अटॅक येणं, गरगरणे अशा समस्या वाढतात.
..........
काय आहे अजिनाेमाेटाे?
भारतीय पदार्थांमध्ये खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजेच Monosodium glutamate (MSG). याचा वापर करून विशिष्ट पदार्थांचे आकर्षण वाढविले जाते. मात्र, या पदार्थाच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. तसेच मेंदू, यकृत, डोकेदुखी हे आजार वाढतात तसेच भुकेवरही परिणाम होतो.
................
...म्हणून चायनिज खाणे टाळा....
अजिनोमोटोचा आहारात अति प्रमाणात समावेश झाल्यास मेटॅबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा त्रास वाढतो. अजिनोमोटोमुळे कार्डियोव्हसक्युलर म्हणजेच हृदयविकार वाढतात, रक्तदाबाचा त्रास वाढतो तसेच मधुमेह बळावण्याची शक्यता वाढते. मेटॅबॉलिझम मंदावण्यास कारणीभूत ठरतात. विविध व्याधी निर्माण होत असल्याने अजिनोमोटोचा समावेश असलेले चायनीज खाणे टाळण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.
.........
- चायनीजच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होतो.
- आकलनशक्ती, स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.
- यकृत, हृदय विकार, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार वाढतात
- भूकेवर परिणाम होतो, त्याचबरोबर लठ्ठपणा वाढतो.
...............
चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे रंग, लठ्ठपणा तसेच इतर विकार वाढविणारा हानिकारक अजिनोमोटो हा पदार्थ आणि प्रमाणापेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर यामुळे चायनीज पदार्थ अपायकारक ठरत असल्याने त्याचे अतिसेवन टाळणे, आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.
- डाॅ. कल्पना मेहता, मधुमेह तज्ज्ञ रत्नागिरी