जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला पोलीस बंदोबस्ताचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST2021-09-10T04:39:29+5:302021-09-10T04:39:29+5:30
तन्मय दाते/ रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबराेबर कोरोनाकाळात अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. ...

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला पोलीस बंदोबस्ताचा आढावा
तन्मय दाते/ रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबराेबर कोरोनाकाळात अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या बंदोबस्ताचा गुरुवारी आढावा घेतला. त्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जाऊन तेथील कामाची पाहणी केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने चाकरमानी गावामध्ये दाखल होत आहेत. कोरोनाचे संकट कायम असल्याने केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही, तर कोरोनाची खबरदारी घेणेही आवश्यक झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनबरोबरच आरोग्य विभाग आणि पोलीस विभागही सज्ज झाले आहे. पोलीस विभागाकडून महामार्गावर आणि रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदाेबस्ताची पाेलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी पाहणी केली. या पाहणीत रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही सुरू आहेत का, याची माहिती घेतली. कोरोना चाचणी करण्याऱ्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला, तसेच पार्किंग व्यवस्था, एस. टी. बसेस, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या मार्गाचीही पाहणी केली.
डॉ. गर्ग यांनी हातखंबा आणि पाली येथे असलेल्या तपासणी नाक्यांनाही भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, रेल्वे पोलीस अधिकारी अजित मदाले उपस्थित होते.