जिल्हा माहिती कार्यालय राज्यात अव्वल

By Admin | Updated: July 12, 2014 00:38 IST2014-07-12T00:34:14+5:302014-07-12T00:38:31+5:30

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा

District Information Office tops the list | जिल्हा माहिती कार्यालय राज्यात अव्वल

जिल्हा माहिती कार्यालय राज्यात अव्वल

रत्नागिरी : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा २०१३ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी कार्यालयाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी प्रथम क्रमांकाचा ५० हजार रुपयांचा धनादेश प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी विजय कोळी यांना प्रदान केला.
प्रशासनात लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता व सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडून २००१ पासून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा राबविण्यात येते. याअंतर्गत २० आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१३साठी जिल्हा माहिती कार्यालयाला हे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कोकण विभागाचे तत्कालीन माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हे अभियान राबविण्यात आले. गतिमान आणि संगणकावर आधारित कार्यालयीन कामकाज, ई-गर्व्हनन्स, झिरो पेंडन्सी यांसारख्या उपक्रमामुळे कार्यालयाला हा सन्मान मिळाला आहे.
पुरस्काराबद्दल कोकण विभागाचे माहिती उपसंचालक रजेसिंंग वसावे यांनी जिल्हा माहिती कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Information Office tops the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.