जिल्हा बँकेने सहकार रूजवला
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-02-29T21:37:40+5:302016-03-01T00:10:23+5:30
१९७३पासून पुढील त्रेचाळीस वर्षे मोगल शेख यांच्या जागेत भाडेतत्त्वावर जागा घेऊन जनसेवा केली.

जिल्हा बँकेने सहकार रूजवला
मंडणगड : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मंडणगड तालुक्यातील सर्वसामान्य खातेदार, शेतकरी यांना सेवा देण्यासाठी ३० जानेवारी १९६५ रोजी मंडणगड शाखा सुरू केली. बँकिंगकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता तालुक्यात सहकार चळवळ रुजावी, यासाठी तालुका शाखेने नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले. मंडणगड ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच कै़ पुरुषोत्तम तथा बाबूभाई शेठ यांच्या जागेत सुरुवातीची आठ वर्षे व त्यानंतर १९७३पासून पुढील त्रेचाळीस वर्षे मोगल शेख यांच्या जागेत भाडेतत्त्वावर जागा घेऊन जनसेवा केली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष, सहकारमहर्षी डॉ. तानाजीराव चोरगे आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ यांनी वेळोवेळी धोरणात्मक निणर्य घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वसामान्यांची बँक कशी होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रत्नागिरी जिल्हा बँक आज आपल्या ७५ शाखांमार्फत सेवा देण्याचे काम करीत आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव व त्यांचे सर्व सहकारी संचालक यांच्या मार्गदर्शनानुसार बँक प्रगती करीत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा बँकांमध्ये तिसऱ्या क्रमांकांवर आपली बँक आहे. सतत अ आॅडिट वर्ग ठेवून बँकेने आता संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण केले आहे. काही संस्थांबरोबरच विविध गटातील लोकांसाठी थेट कर्ज योजनांद्वारे खातेदार, ठेवीदार, भागधारक यांना सेवा देण्यात येत असल्यामुळे बँक आता लोकाभिमुख झाली आहे. या शाखेला त्यावेळचे जिल्ह्यातील संचालक अध्यक्ष कै़ बी जी. खातू, कै. टी. के. शेट्ये, कै. शामराव पेजे, कै. गोविंदराव निकम, कै़ मोहनराव इंदुलकर, कै. सदाशेठ आरेकर यांच्या नेतृत्त्वाबरोबर स्थानिक संचालक कै. मनोहरपंत अधिकारी, कै. भाई पाटील, कै़ अप्पासाहेब गोसावी, कै़ अर्जुरावन जगताप, प्रकाश शिगवण, रत्ना लेंढे, विठाबाई कदम, कै़ उदय बेलोसे व विद्यमान संचालक रमेश दळवी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. त्यामुळेच शाखा प्रगतीपथावर राहिली आहे. बँकेचे मुख्य व्यवस्थापक कै. साखळकर, कै. जैतपाल, मंडणगड शाखेचे प्रथम शाखाधिकारी शशिकांत पाटणे कर्मचारी व त्यांच्या सहकऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे ही शाखा आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सहकार क्षेत्रात कै. गोविंदराव निकम यांनी जिल्ह्यामध्ये भरीव काम केले आहे. आज बँक सर्वसामान्य शेतकरी, छोटे उद्योजक, नोकरवर्ग या सर्वांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक पातळीवर तालुका कर्ज उपसमितीला १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजुरीचे अधिकार शाखाधिकाऱ्यांना २ लाख तसेच नोकरदार कर्मचारी यांना पगार कर्जाची ५ लाखापर्यंतेचे त्वरित कर्ज मंजुरीचे अधिकारी देण्यासाठी धोरणात्मक बदलदेखील करण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)