जिल्ह्यात ४२ हरकती निकाली
By Admin | Updated: February 10, 2015 00:05 IST2015-02-09T22:40:30+5:302015-02-10T00:05:29+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरीतील तीन ग्रामपंचायतीत नव्याने आरक्षण

जिल्ह्यात ४२ हरकती निकाली
रत्नागिरी : जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींकडून आरक्षणाबाबत आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन त्या निकाली काढण्यात आल्या. तालुक्यातील नाचणे, खेडशी आणि गडनरळ या तीन ग्रामपंचायतींत आज नव्याने आरक्षण काढण्यात आले.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ४७२ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध कारणांनी रिक्त झालेली पदे भरण्यासाठी काहींच्या पोटनिवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्त्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंतच्या टप्प्यात ग्रामपंचायतींसाठी एकूण सदस्य संख्या ठरविणे व प्रारूप प्रभागरचना करणे, प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे, तसेच निवडणूक आरक्षणासाठी सोडत पद्धतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे आदी प्रक्रिया पार पडलेल्या आहेत.हरकती सादर करण्याची अंतिम मुदत ५ फेब्रुवारी होती. त्यानुसार जिल्ह्यातून ४२ हरकती जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेऊन त्या हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, खेडशी आणि गडनरळ या तीन ग्रामपंचायतीमधील चिठ्यांद्वारे नव्याने आरक्षण काढण्यात आले. (प्रतिनिधी)
मंडणगड (२)उमरोली, म्हाप्रळ
दापोली (७)दाभोळ, शिरवणे, कोंढे, गिम्हवणे, रूखी, हर्णे, गुडघे
खेड (६)ऐनवरे, बोरघर, कुंभाड, चोरवणे, आवाशी, फुरूस
चिपळूण (५)मार्गताम्हाणे खुर्द, नायशी, आकले, रामपूर, चिवेली
संगमेश्वर (३)आंगवली, घेराप्रचितगड, साडवली
रत्नागिरी (१२)आगरनरळ, कळझोंडी, वाटद, गडनरळ, नांदिवडे, गावखडी, $$््िगोळप, कासारी, मिरजोळे, पाली, नाचणे, खेडशी
लांजा (१)रावारी
राजापूूर (६)कोळंब, दळे, करक, कार्जिर्डा, महाळुंगे, कारवली