विघ्नहर्ता ग्रुपकडून सदस्यांना रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:29+5:302021-07-22T04:20:29+5:30
अडरे : चिपळूण शहरातील विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने ग्रुपमधील सर्व सदस्यांना रोपांचे वाटप केले जाणार आहे. सोमवारपासून या उपक्रमाला सुरूवात झाली. ...

विघ्नहर्ता ग्रुपकडून सदस्यांना रोपांचे वाटप
अडरे : चिपळूण शहरातील विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने ग्रुपमधील सर्व सदस्यांना रोपांचे वाटप केले जाणार आहे. सोमवारपासून या उपक्रमाला सुरूवात झाली. प्रत्येक सदस्याने आपल्या घराच्या परिसरात किंवा अन्य ठिकाणी एक तरी झाड लावावे आणि ते मोठे करावे, असे आवाहन ग्रुपकडून करण्यात आले आहे.
काही सदस्यांना आंबा, फणस, पेरू, काजू इत्यादी रोपांचे वाटप करण्यात आले आहे. सदस्य सोडून अन्य कोणाला रोप हवे असल्यास त्यांनीही ग्रुपच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीराम फंड वैश्य वसाहत अंतर्गत विघ्नहर्ता निर्मित श्रीराम उद्यान आणि जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत असलेल्या केदार उद्यानाची साफसफाई ‘विघ्नहर्ता’च्या सदस्यांनी केली. वृक्ष लागवड करण्यासाठी विघ्नहर्ता ग्रुपला ओंकार साठे आणि सहस्त्रबुद्धे यांनी रोपे दिली आहेत.