आमदार शेखर निकम यांच्यावतीने परिचारिका दिनी मास्क वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST2021-05-13T04:32:09+5:302021-05-13T04:32:09+5:30

चिपळूण : कोरोनाच्या संकटात अनेक परिचारिका आपल्या जिवाची पर्वा न करता जनसामान्यांना सेवा देत आहेत. या परिचारिकांना बुधवारी ...

Distribution of Nurses Day Nurses on behalf of MLA Shekhar Nikam | आमदार शेखर निकम यांच्यावतीने परिचारिका दिनी मास्क वाटप

आमदार शेखर निकम यांच्यावतीने परिचारिका दिनी मास्क वाटप

चिपळूण : कोरोनाच्या संकटात अनेक परिचारिका आपल्या जिवाची पर्वा न करता जनसामान्यांना सेवा देत आहेत. या परिचारिकांना बुधवारी जागतिक परिचारिका दिनानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.

या परिचारिका स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांची ही सेवा इतिहासात नोंदली जाईल. त्यांच्या कार्याला सलाम व शुभेच्छा असल्याच्या भावना आमदार निकम यांनी व्यक्त केल्या. मास्कचे वाटप करताना रूपेश इंगावले, किशोर कदम, मेडिकल प्रतिनिधी प्रणव भोसले, आरोग्यसेविका स्नेहा चौधरी, अंकिता शिवगण, अधिपरिचारिक शिवानी आंब्रे, रिया सावर्डेकर, मंजूषा मोहिते, प्रियांका पवार, पल्लवी माने या परिचारिका उपस्थित होत्या. यावेळी परिचारिका यांनी आमदार निकम यांचे मन:पूर्वक आभार मानले.

Web Title: Distribution of Nurses Day Nurses on behalf of MLA Shekhar Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.