मंडणगड शासकीय कार्यालयांमध्ये मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:17+5:302021-03-30T04:19:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : तालुक्यातील शिमगा उत्सवाच्या निमित्ताने नियोजन व वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...

मंडणगड शासकीय कार्यालयांमध्ये मास्कचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यातील शिमगा उत्सवाच्या निमित्ताने नियोजन व वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी मंडणगड तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.
एस. टी. बसस्थानक, मंडणगड तहसीलदार कार्यालय, मंडणगड पोलीस कर्मचारी यांना मास्कचे वाटप माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कोकणची संस्कृती जपणारा सण साजरा करा; पण कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी घ्या. तसेच कोरोनापासून संरक्षण करण्यासंबंधित उपाययोजना निमित्ताने मास्क वाटप करण्यात आल्याचे संजय कदम यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे सचिव प्रकाश शिगवण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज उकये, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफर मुकादम, मंडणगड युवक तालुकाध्यक्ष लुकमान चिखलकर, मंडणगड शहराध्यक्ष वैभव कोकाटे, मंडणगड नगरपंचायत गटनेते सुभाष सापटे, मंडणगड नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे, राजेंद्र आंबेकर, राजा लेंडे, उद्योजक दीपक घोसाळकर, सरफराज चिपोलकर, हरेश मर्चंडे उपस्थित होते.