शिक्षक संघातर्फे कोविड साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST2021-06-06T04:24:04+5:302021-06-06T04:24:04+5:30

आबलोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा, तालुका गुहागरतर्फे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना व कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक ...

Distribution of Kovid material by the teachers team | शिक्षक संघातर्फे कोविड साहित्याचे वाटप

शिक्षक संघातर्फे कोविड साहित्याचे वाटप

आबलोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा, तालुका गुहागरतर्फे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना व कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, सरपंच तुकाराम पागडे, पोलीसपाटील महेश भाटकर, प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. गावंड, प्राथमिक शिक्षक संघाचे तुकाराम निवाते, महेंद्र रेडेकर, नंदकुमार पवार, दीपक रेपाळ, रवींद्र कुळ्ये, अजय खेराडे, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र रेडेकर यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळवली येथे पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश तांबे, माजी विस्तार अधिकारी सुलतान मुलाणी, ग्रामस्थ, रूग्णालय कर्मचारी व शिक्षक संघाचे सभासद यांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक रेपाळ यांनी केले तर तालुका संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र कुळ्ये यांनी आभार मानले.

---------------------------

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा, तालुका गुहागरतर्फे तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना व कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of Kovid material by the teachers team