मनसेतर्फे आराेग्य साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:00+5:302021-06-20T04:22:00+5:30

राजापूर : मनसेचे माजी तालुका संपर्क प्रमुख भूषण विचारे यांनी शासकीय कार्यालय, पाेलीस स्थानक, आराेग्य केंद्र यांना वाफेचे मशीन ...

Distribution of health materials by MNS | मनसेतर्फे आराेग्य साहित्याचे वाटप

मनसेतर्फे आराेग्य साहित्याचे वाटप

राजापूर : मनसेचे माजी तालुका संपर्क प्रमुख भूषण विचारे यांनी शासकीय कार्यालय, पाेलीस स्थानक, आराेग्य केंद्र यांना वाफेचे मशीन व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.

तालुक्यात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप व मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. तसेच तहसील कार्यालय, राजापूर व नाटे पोलीस स्थानक, आरोग्य केंद्र येथे वाफेचे मशीन, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पत्रकारांनाही वाफेचे मशीन व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यालयांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष सुनील जठार, जयेंद्र कोठारकर, उपाध्यक्ष संजय जड्यार, विभाग अध्यक्ष अमित जड्यार, मंदार राणे, महिला विभाग अध्यक्ष जान्हवी धालवलकर, उपाध्यक्ष अमित चिले, उपविभाग अध्यक्ष संदेश मोरे, संदीप पळसमकर, उदय धालवलकर, अब्बास मुजावर, मंगेश मोरे, विजय घाडये, रामदास खांबल, पंकज पंगेरकर, राकेश कणेरी, संकेत वाडेकर उपस्थित होते.

Web Title: Distribution of health materials by MNS