मनसे तालुका शाखेतर्फे वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST2021-07-07T04:38:21+5:302021-07-07T04:38:21+5:30

मंडणगड : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तालुक्यातील पत्रकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघाचे कुणबी भवन येथील कार्यालयात हा ...

Distribution of goods by MNS taluka branch | मनसे तालुका शाखेतर्फे वस्तूंचे वाटप

मनसे तालुका शाखेतर्फे वस्तूंचे वाटप

मंडणगड : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तालुक्यातील पत्रकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघाचे कुणबी भवन येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष महेश कंचावडे, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नवज्योत गौड, सुरज मुढे, रोशन म्हाब्दी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, विजय जोशी, सचिन माळी, विजय पवार उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेश कंचावडे म्हणाले की, जनतेच्या विविध समस्या जगासमोर आणण्यासाठी पत्रकार दिवस रात्र, ऊन, वारा, पाऊस कशीचीही पर्वा न करता आपले काम करीत असतात. पावसात फिरत असताना पत्रकारांचे आरोग्य उत्तम रहावे याकरिता आपुलकीच्या भावनेने रेनकोट्स दिले आहेत. तसेच कोविडकाळात पत्रकारांनी नागरिकांच्या हिताची भूमिका मांडली असून, आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी बातम्यांच्या स्वरूपात पाठपुरावा करून जनरेटा संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांच्याकडे ठळकपणे पोहाेचविला, असेही ते म्हणाले.

-----------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंडणगड शाखेतर्फे तालुक्यातील पत्रकारांना रेनकाेटसचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष महेश कंचावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Distribution of goods by MNS taluka branch