दहावीच्या गुणपत्रिकांचे वितरण २६ रोजी
By Admin | Updated: June 18, 2014 00:57 IST2014-06-18T00:45:03+5:302014-06-18T00:57:08+5:30
आॅनलाईन निकाल जाहीर

दहावीच्या गुणपत्रिकांचे वितरण २६ रोजी
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागिय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप २६ रोजी दुपारी ३ वाजता त्या त्या शाळांमध्ये होणार आहे.
माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकांचे वाटप विभागीय मंडळातर्फे २६ रोजी सकाळी ११ वातजा तर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता माध्यमिक शाळांतर्फे विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर ५ जुलै पर्यत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत.
उत्तरपत्रिकेचे पुर्नमूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायापत्र घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात पुर्नमूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागिय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)