जाकादेवीत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:20+5:302021-08-29T04:30:20+5:30

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ...

Distinguished students felicitated at the hands of dignitaries at Jakadevi | जाकादेवीत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

जाकादेवीत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

जाकादेवी प्रशालेच्या कै. प्रभावती मधुकर खेऊर सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याबाबत पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यामध्ये चर्चाही करण्यात आली. पालकांच्या अनुमतीने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्थेने आपली भूमिका मांडली. या भूमिकेला पालकांनी सहमती दर्शवली आहे.

या सभेत दहावीतील भूषण अवधूत दांडेकर, सानिका अलंकार महाकाळ, यश पांडुरंग धोंगडे तर बारावी कला शाखेतील शर्वरी अर्जुन गावणकर, तनय तुळशीराम घाणेकर, नम्रता चंद्रकांत जोगळे, वाणिज्य शाखेतील भक्ती महेंद्र खेडेकर, मयुरी प्रकाश धामणे, दक्षता प्रकाश खापरे तर शास्त्र शाखेतील निकेश अशोक सुवरे मिथिला महेंद्र मेस्त्री, साहिल सूर्यकांत वडके तसेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्तीधारक नमिता संतोष बावदाने या गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील मयेकर यांच्यासमवेत संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पाटील, विश्वस्त सुधीर देसाई, निमंत्रित संचालक श्रीकांत मेहेंदळे, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, संकेत देसाई, पालक संघाचे सचिव संतोष पवार, ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.

ऑनलाइन शिक्षण, दीक्षा ॲप, व्हाॅट्सॲप यातून मिळणारे शिक्षण मर्यादित आहे. ग्रामीण भागात अनेकांकडे साधे मोबाइल नसल्याने ही शिक्षणप्रकिया परिपूर्ण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येणे गरजेचे असल्याचे सुनील मयेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याला उपस्थित सर्व पालकांनी अनुमती दर्शविली. पालक सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे यांनी मानले.

Web Title: Distinguished students felicitated at the hands of dignitaries at Jakadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.