शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:08 IST

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला.

चिपळूण : काही दिवसांवरच शिमगोत्सव येऊन ठेपला असून सर्वत्र त्याची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानच्या बैठका सुरु झाल्या आहेत. शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात बैठक सुरू असताना पालखीच्या वाटेवरून वाद झाला आणि त्यातून एकावर खूनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ला झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली.गेली दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र शिमगोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी उत्सव साधना करतात मंदिरातच शिमगोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्वत्र शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या उत्सवासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी देखील कोकणच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय देवस्थान मार्फत शिमगोत्सवाची तयारी केली जात आहे.शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला. या वादा विषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र शिमगोत्सवानिमित्त पालखीची वाट मोकळी करावी अशी मागणी एका कुटुंबाने केली.या रागातून एकाने चक्क त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकू सारख्या धारदार हत्याराने वार केला. या प्रकारामुळे बैठकीला असलेले सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. तर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला झालेली व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी