शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणार : पालकमंत्री उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:51 IST

१ कोटी रुपयांची तरतूद करणार

रत्नागिरी : अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे, वादळ अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. आपण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती कक्षाचे डिजिटलायझेशन करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी सकाळच्या सत्रातच या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अधिक महत्त्व आले आहे. कोठेही आपत्ती ओढवते तेव्हा या कक्षाकडूनच सर्व गोष्टींचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी येथील संपर्क यंत्रणा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याचे डिजिटलायझेशन गरजेचे आहे. या कक्षाकडून प्रत्येक तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याशी थेट संपर्क साधला जावा, यासाठी हॉटलाईनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अन्य संपर्क यंत्रणाही आधुनिक करण्याची गरज आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.या कामासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने अधिकाऱ्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला नव्हता. इतक्या मोठ्या निधीची तरतूद कशी होणार, असा त्यांच्यासमोरील प्रश्न होता. मात्र आता निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. त्यामुळे लवकरच हे काम हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत