ग्रामस्थांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:54+5:302021-09-02T05:08:54+5:30
खेड : तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी व उत्तेकरवाडीला जोडणारा साकव वाहून गेल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमध्ये आलेल्या महापुरात ...

ग्रामस्थांची गैरसोय
खेड : तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी व उत्तेकरवाडीला जोडणारा साकव वाहून गेल्याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमध्ये आलेल्या महापुरात हा साकव तुटला आहे. त्यावर दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीही अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याने परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
मोफत मार्गदर्शन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य सावंत याने गृहिणींना गृह उद्योगाची माहिती दिली. कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त फायदा तसेच घरच्या घरी दुधाचे पदार्थ बनविण्याबाबत माहिती दिली. शिवाय अन्य विविध उत्पादनांबाबतही माहिती दिली.
मोफत आरोग्य शिबिर
खेड : कोकणी डॉक्टर्स असोसिएशन, कोकण डिझाईन डिझास्टर्स मॅनेजमेंट, तु. बा. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील पोफळवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामस्थांची तपासणी केली. होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सुनील जोशींचा सत्कार
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील सुनील जोशी यांचा सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये ते विद्यमान अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यापर्यंत अध्यक्षांच्या दालनात हवालदारपदी जोशी यांनी काम सांभाळले होते.