शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात साकारणार डिजिटल लायब्ररी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:51 IST

रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डिजिटल युगाची नवी लायब्ररी या संदर्भाने अधिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

ठळक मुद्देशतकोत्तर शतक महोत्सव - दीपक पटवर्धन यांचा संकल्पवाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ एकत्रित करण्याचा प्रयत्न

अरूण आडिवरेकररत्नागिरी : रत्नागिरीतत १८२८ साली स्थापन झालेलं हे वाचनालय १४ जानेवारी २०१९ रोजी १९१ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानंतर १० वर्षांनी ही संस्था २०० वर्षांची होईल. शतकोत्तर शतकात वाचनालयाचा जुना इतिहास, जुने संदर्भ संकलित करण्याचा मनोदय जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर डिजिटल युगाची नवी लायब्ररी या संदर्भाने अधिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.याबाबत माहिती देताना दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, सलग प्रदीर्घ काळ हे वाचनालय सुरू असून, ग्रंथ वाचकांची वाचनतृष्णा अखंड भागवत आहे. आज वाचनसंस्कृती लोप पावते की काय, अशी चिंता अनेकजण व्यक्त करतात. परंतु, वाचन अखंड सुरू राहणार आहे.

कदाचित पृष्ठांकित ग्रंथांची जागा इलेक्ट्रॉनिक साधनांनी पूर्णांशाने घेतलेली असेल, पण साहित्य निर्मिती ही होतच राहील. कारण तहान पाण्याची असो की वाचनाची ती अव्याहत राहते. हेच या ग्रंथालयाच्या २०० वर्षांच्या वाटचालीकडे पाहिल्यावर अधिक तीव्रतेने पटते.महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या वाचनालयांपैकी हे वाचनालय असून, ते आपल्या कोकणात, आपल्या रत्नागिरीत आहे, याचा अभिमान आपल्याला नक्की आहे. समृद्ध वाचनालय हे त्या शहराची सुसंस्कृतता अधोरेखित करते. ग्रंथालयासारख्या सरस्वतीची आराधना करणाऱ्या संस्था, ज्या शहराने १९१ वर्ष जोपासल्या.

केवळ राजाश्रय मिळून संस्था विकसित होत नाहीत तर जागृत, उच्च अभिरुची जोपासणाऱ्या समाजाच्या सहभागानेच वाचनालये टिकून राहतात आणि असं वाचनालय १९१ वर्षे आपली साथ करतंय. त्यामुळे समस्त रत्नागिरीकरांसाठी हे वाचनालय अभिमानास्पद आहे.१९० वर्ष पूर्ण होत असताना, २०० वर्षांचा सुवर्णक्षण साजरा करण्याची आतुरता लपवता येत नाही. २९९ वर्ष पूर्ण करताना हे वाचनालय कशा स्वरूपात असावे, भौतिक स्वरूप, उत्तम वास्तू अद्ययावत असावी, नवीन तंत्रज्ञान साधने असावीत, अभ्यासिका अद्ययावत असावी, ग्रंथसंपदा वृद्धिंगत होत राहावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

या वाचनालयाची वाचक संख्या १० वर्षात किमान २५ हजार होईल, युवक वाचक, विद्यार्थी वाचक यांना या वाचनालयाचे कसे आकर्षण वाटेल, असे वाचनालयाचे स्वरूप उभे करणे, या जुन्या ग्रंथसंपदेला संरक्षित करत ही जुनी ग्रंथसंपदा जगभरातील वाचकांना उपलब्ध होईल यासाठी तंत्रज्ञानाचा प्रबंध करणे, असे अनेक उपक्रम मनात असल्याचे त्यांनी सांगितले.विविध समित्या स्थापणार२०० वर्ष साजरी करताना संस्मरणीय गोष्टींनी हे वाचनालय कसे समृद्ध करावे, याची योजना आखण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीकरांबरोबरच महाराष्ट्रातले साहित्यिक, प्रकाशक, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, प्रामुख्याने युवक, पत्रकार आणि सर्व ग्रंथप्रेमी नागरिक या सर्वांनी वैचारिक योगदान करावे. युवकांच्या पुढाकाराने विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :libraryवाचनालयRatnagiriरत्नागिरी