शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Ratnagiri: मोबदल्याआधी काम, ठेकेदाराला दाम; शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:25 IST

ग्रामस्थांनी १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला

चिपळूण : भूसंपादनाआधीच तालुक्यातील कापरे-भेलवणे येथील साठवण तलावाची खोदाई झाली. ठेकेदाराला २२ कोटींचे बिलही अदा झाले. मात्र, या तलावासाठी जागा देणाऱ्या ७९७ शेतकऱ्यांना आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ज्यांचे संमतीपत्रानुसार भूसंपादन झाले आहे, त्यांना मोबदला न मिळाल्यास ग्रामस्थांनी १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

प्रकल्पग्रस्तांतर्फे अवधुत मोरे, आरती भुर्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे भूसंपादन सहा वर्षांपासून रखडलेले आहे. न्याय मागितल्यावर खासगी वाटाघाटीने थेट खरेदी प्रस्ताव करून भूसंपादन करावे, असे आदेश देत जानेवारी २०२४ मध्ये चिपळूण प्रांताधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला. मात्र, सदर भूसंपादनात व्यत्यय आणला जात आहे. शंभर टक्के संमतीपत्र झाल्याशिवाय पुढील काम करता येत नसल्याचे प्रांताधिकारी सांगत आहेत.आजपर्यंत ७९७ पैकी ६२३ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. संमतीपत्र पूर्ण झालेल्यांना १ मे २०२५ पूर्वी मोबदला मिळावा, मृद व जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांनी ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२३ या कालावधीत भूसंपादन अपूर्ण ठेवल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी करावी, ऑक्टोबर २०१९ मध्ये संमती नसताना जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन ठेकेदाराला २२ काेटी १ लाख रुपये बिल देणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत.

सगळीच कामे धेडगुजरी

  • जागा ताब्यात नसताना साठवण तलावाचे काम सुरू झाले. भूसंपादन रखडले असताना पुन्हा खासगी वाटाघाटीने थेट खरेदी प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रारंभी शेतकऱ्यांनी होकार दिला. ६२३ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. उर्वरितांमध्ये काही मयत तर काही परदेशात आहेत.
  • अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वांची संमतीपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे मृतांचा वारस तपास आणि त्यासाठीचा वेळ, खरेदीपत्राचा खर्च या सर्वामुळे प्रकल्पाचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीGovernmentसरकार