नाणीज येथे अतिसाराची लागण

By Admin | Updated: July 15, 2017 15:27 IST2017-07-15T15:27:41+5:302017-07-15T15:27:41+5:30

वैद्यकीय पथकाची त्वरित कार्यवाही

Diarrhea infections at Nagas | नाणीज येथे अतिसाराची लागण

नाणीज येथे अतिसाराची लागण

रत्नागिरी, दि. १५ : तालुक्यातील नाणीज येथील ९ वाड्यांतील ३३ लोकांना अतिसारची लागण झाली होती.

प्राथमिक आरोग्य केंद्र, खानू येथील वैद्यकीय पथकाने त्वरित कार्यवाही करत या रुग्णांवर उपचार केल्यामुळे ही साथ आटोक्यात आली आहे.


ग्रामस्थे येथील जॅकवेलचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. मात्र, या पाण्याचे शुद्धीकरण न केल्यामुळे तसेच पावसाळ्यामध्ये या पाण्यात बाहेरील पाणी मिसळल्यामुळे अतिसारची लागण झाल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायतीतर्फे पाणी शुद्धीकरण व ओ. आर. एस. पाकिटांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Diarrhea infections at Nagas