धनश्री शिंदे आंतरराज्य सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST2021-09-17T04:37:12+5:302021-09-17T04:37:12+5:30

चिपळूण : बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे चिपळूणच्या माजी सभापती धनश्री रवींद्र शिंदे यांना आंतरराज्य पुरस्कार देऊन त्यांचा ...

Dhanashree Shinde honored with Inter-State Service Pride Award | धनश्री शिंदे आंतरराज्य सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

धनश्री शिंदे आंतरराज्य सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

चिपळूण : बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे चिपळूणच्या माजी सभापती धनश्री रवींद्र शिंदे यांना आंतरराज्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतर्गत दिला जाणारा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, खासदार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते धनश्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. येथील पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांनी ओवळी गणासह तालुक्यात महिला बचत गटांचे मेळावे घेत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षक व पालकांचा समन्वय, जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी केलेले प्रयत्न, ग्रामीण भागातील लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून तत्पर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी घेतलेली मेहनत, शेतकरी कुटुंबांना आवश्यक कृषी अवजारे मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी केलेल्या कार्याची दखल बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनने घेतली.

Web Title: Dhanashree Shinde honored with Inter-State Service Pride Award