गुणदे विद्यालयाच्या ‘ऑनलाईन समर कॅम्प’मध्ये धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:58+5:302021-05-26T04:31:58+5:30
चिपळूण : खेड तालुक्यातील गुणदे येथील सद्गुरु काडसिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय व गुरुकुल विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समर कॅम्पचे ...

गुणदे विद्यालयाच्या ‘ऑनलाईन समर कॅम्प’मध्ये धमाल
चिपळूण : खेड तालुक्यातील गुणदे येथील सद्गुरु काडसिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय व गुरुकुल विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी जोशी, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका विचारे व सर्व सहकारी शिक्षक यांनी दहा दिवसांच्या कालावधीचा समर कॅम्प आयोजित केला होता.
त्यामध्ये सुंदर हस्ताक्षर, कागद काम (क्राफ्ट पेपर), शब्दकोडी, योगासने, इंग्रजी ग्रामर स्किल, गडकिल्ले माहितीपट, संस्कृत श्लोक, रंगकाम (स्टोन पेंटिंग), विज्ञानविषयक महितीपट, गणिताशी गट्टी, निबंध लेखन असे विविध उपक्रम घेण्यात आले. या सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे सचिव सुभाष पवार यांनी विशेष प्रयत्न केले. या कॅम्पमुळे घरात बसून कंटाळलेल्या मुलांना काही नवीन करण्याची संधी मिळाली़ त्यामुळे पालकही खुश होते. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे व सर्व संचालक यांनी सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.