अविकसित धनगर वाड्या विकसित करणार : महादेव जानकर
By Admin | Updated: March 9, 2017 18:14 IST2017-03-09T18:14:22+5:302017-03-09T18:14:22+5:30
देवाचा डोंगर पर्यटनदृष्ट्या विकसित करणार

अविकसित धनगर वाड्या विकसित करणार : महादेव जानकर
अविकसित धनगर वाड्या विकसित करणार : महादेव जानकर
खेड : तालुक्यातील विविध सोयी सवलतींपासून वंचित राहिलेल्या धनगरवाड्या विकसित करण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राज्याचे मंत्री महादेव जानकार यांनी खेड येथील भाजपच्या शिष्टमंडळला दिले. तसेच देवाचा डोंगर हे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण यानी दिली आहे.
यावेळी संजय यादवराव, संदीप चव्हाण, संतोष लंबाडे, पप्पू मोरे, राजेंद्र शेलार, शांताराम सकपाळ, सुधाकर दरेकर, संतोष बंदरकर,उदय बोरकर, अनंत कांर्देकर, बाबू बावदाने हे पदाधिकारी होते. या पदधिकाऱ्यांनी धनगरवाड्या विकासापासून अद्याप वंचित राहिल्याचे निदर्शनास आणून दिले. हा समाज आपला विकास साधू शकला नाही. त्यांच्या विकासासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होने गरजेचे असल्याचे शशिकांत चव्हाण यांनी जानकर यांच्या लक्षात आणून दिले. पर्यटनाच्या माध्यमातून या वाड्यांचा विकास होऊ शकतो. तसेच त्यांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो हे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी जानकार यांनी याकरिता आपण निधीही देऊ, असे सांगितल्याचे शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)