शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

देवडेची आकांक्षा कदम ठरली मालदीवमध्ये ‘क्वीन’ : रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:46 IST

यामुळे भारताने ‘बेस्ट सिरीज’ पटकावले आहे, तर दुहेरीच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे. आकांक्षा सध्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे.

ठळक मुद्दे मालदीव येथील प्रेसिडेंट चषक कॅरम लीग स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत मिळविले सुवर्ण

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम ही राष्टÑीय खेळाडू आंतरराष्टय स्पर्धेमध्ये चांगली चमक दाखवत भारत - मालदीव प्रेसिडेंट चषक कॅरम लीगची विजेती ठरली आहे. आकांक्षाने भारताचा झेंडा मालदीवमध्ये फडकावत सुवर्णपदक मिळविले आहे.

अत्यंत कमी वयामध्ये आकांक्षाने अवकाशाला गवसणी घालत हे यश संपादन केले आहे. श्रीलंकेतील इंडो-मालदीव येथे ६ ते १० आॅक्टोबर या कालावधीत आंतरराष्टÑीय कॅरम स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये श्रीलंका, मालदीव, भारत या देशांचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये भारताचे नेतृत्व संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा करीत होती. यामध्ये तिने सिंगलमध्ये ९-८ असा सामना मारला आहे. यामुळे भारताने ‘बेस्ट सिरीज’ पटकावले आहे, तर दुहेरीच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे. आकांक्षा सध्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे.

तिला कॅरमपटू संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, महाराष्टÑ कॅरम असोसिएशनचे अरूण केदार, विनोद मयेकर, मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, रत्नागिरीचे प्रदीप भाटकर, मिलिंद साप्ते लिमये, मंदार दळवी, राहुल बर्वे, रवी कॅरमचे रवी घोसाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

मानाचा तुराआकांक्षाचे मामा संदीप देवरूखकर हे राष्टÑीय कॅरमपटू असल्याने त्यांचा प्रभाव तिच्या खेळावर पडला. लहानपणापासून कॅरम खेळताना कॅरमचे बाळकडू ती मामाकडून घेऊ लागली. कॅरम खेळण्यामध्ये तरबेज होत तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवले आहे. राष्टÑीय कॅरमपटूबरोबरच आज आकांक्षाने आंतरराष्टÑीय खेळाडू म्हणून मानाचा तुरा मिळविला आहे.अनेकांसाठी ‘आयडॉल’१४ वर्षांची असलेली आकांक्षा ही भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेली पहिलीच लहान खेळाडू ठरली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातून आंतरराष्टÑीय स्पर्धेकरिता भाग घेणारी आकांक्षा ही तिसरी कॅरमपटू ठरत आहे. आकांक्षाने आंतरराष्टÑीय स्तरावर मिळविलेले यश हे स्पृहणीय आहे. कमी वयामध्ये मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे आकांक्षा ही अनेकांसाठी ‘आयडॉल’ बनली आहे.मालदीव येथे भारत - मालदीव प्रेसिडेंट चषक कॅरम लीग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आकांक्षा कदम हिच्यासमवेत संघातील खेळाडू उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaldivesमालदीव