शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च, तरी पाण्याची समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:06 IST

प्रशांत सुर्वे मंडणगड : जलजीवन मिशनसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पाणीटंचाईची समस्या मात्र वर्षानुवर्षे तशीच ...

प्रशांत सुर्वेमंडणगड : जलजीवन मिशनसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पाणीटंचाईची समस्या मात्र वर्षानुवर्षे तशीच आहे. तालुक्यातील कागदावर असलेली लोकसंख्या व वास्तवात असलेली लोकसंख्या यात तफावत आहे. ५० टक्क्यांहून अधिक लोक तालुक्याबाहेर आहेत. त्यामुळे टंचाईचे सावट तुलनेने कमी जाणवत आहे. कागदावर आहेत, तेवढे लोक प्रत्यक्षात त्या - त्या गावांमध्ये असते तर टंचाईचे हे चित्र अधिक भीषण झाले असते.मंडणगड पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी यंदा काहीशा विलंबाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यात तालुक्यातील ३१ गावातील ३७ वाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याकरिता १ कोटी २३ लाख इतका निधी खर्च होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याचा विलंब लक्षात घेता दोन टप्प्यात याकरिता काम केले जाणार आहे.टंचाई कृती आराखड्यात नवीन विंधन विहीर खणणे, जुन्या नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना सुरू करणे व आवश्यकता भासल्यास टँकरचा पाणी पुरवठा करण्यासाठीही निधीचे नियोजन करण्यात आले आहे. तीव्र टंचाईच्या काळात तालुक्यातील पाच गावातील सात वाड्यांवर दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. विविध नळपाणी योजनांची सातत्याने अंमलबजावणी करूनही पाण्याची गैरसोय दूर झालेली नसल्याची तक्रार तालुक्यातून नेहमीच केली जाते.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ८०हून अधिक गावात प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याची अनेकांची तक्रार आहे. त्याचेच प्रतिबिंब टंचाई आखड्यात दिसत आहे. या पुढील काळात या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. टंचाई आराखड्यात १३ गावातील १४ वाड्यांमध्ये नवीन विंधन विहीर, एका गावातील एका वाडीवर विंधन विहीर दुरुस्ती, १० गावातील १३ वाड्यांवर नळयोजना दुरुस्ती, ५ गावातील ६ वाड्यांवर तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनेचे काम प्रस्तावित आहे. याखेरीज २ गावातील ३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणे यंत्रणेनेच अपेक्षित धरले आहे.तालुक्यातील तिडे, भोळवली, तुळशी, चिंचाळी या धरणातील पाण्याचा थेट वापर केला जात नाही. मात्र, या धरणामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. तिडे धरणवगळता भोळवली व तुळशी धरणातील पाण्याचा शेतीसाठीही उपयोग होत नाही. जुन्या धरणांचे कालवे बुजून गेले आहेत. त्यामुळे गावालगत धरण असूनही गावात पाणी नाही, अशी स्थितीही दिसते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी