शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Ratnagiri : पॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:24 IST

CoronaVirus Ratnagiri: लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला़ बरं, आपण पॉझिटिव्ह आहोत हे माहित असूनही नवरदेव बोहोल्यावर चढल्याने २३ जणांवर गृह अलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे़ तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर गुहागरात वऱ्हाडी मंडळींना ५० हजारांचा दंड

गुहागर : लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला़ बरं, आपण पॉझिटिव्ह आहोत हे माहित असूनही नवरदेव बोहोल्यावर चढल्याने २३ जणांवर गृह अलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे़ तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील मुलाचे लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरले होते. हा विवाह ५ मे रोजी होता़ विवाहासाठी प्रांताधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यातील अटीप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ मे रोजी कोरोनाची तपासणीही केली होती. प्रांतांनी दिलेल्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीलाही देण्यात आली होती.

गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे कोरोना तपासणी अहवाल आधीच तपासले होते. ५ मे रोजी शीरचे सरपंच विजय धोपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी. एच. राठोड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पोलीस पाटील संदीप घाणेकर हे सर्वजण विवाहस्थळी गेले होते.विवाहादरम्याने वरपक्षाकडे कोरोना तपासणीचा अहवाल मागण्यात आला. त्यावेळी आम्ही चाचणी केली असून, अजून अहवाल आलेला नसल्याचे सांगण्यात आले. विवाह सोहळ्यात विघ्न नको म्हणून प्रशासनाने अधिक चौकशी न करता प्रांतांच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा, अशी सूचना दिली़.

वरपक्षाकडील कोरोना चाचणीची खात्री करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली. त्यावेळी नवरदेव कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच प्रशासकीय पथक विवाहस्थळी दाखल झाले आणि या पथकाने वरपक्षाकडे चौकशी सुरू केली. दाखल्याची मागणी केली.अखेर वराने आपण कोरोनाबाधित असल्याची कबुली दिली. ही बाब उघड होताच शासकीय पथकाने नवरदेव कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याने साथ रोग नियंत्रण प्रसाराबद्दल असा उल्लेख करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नवरा मुलगा कोरोनाबाधित असल्याने सर्वांना तातडीने गृह अलगीकरणात जाण्याच्या सक्त सूचना दिल्या़ या कारवाईनंतर नवरदेव कोरोनाबाधित असतानाही शीरमधील मंडळींनी वधुची सासरी पाठवणी केली आहे. तर नवरदेवासह सर्वांची वरात गृह अलगीकरणात पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नRatnagiriरत्नागिरी