डेरवण पूल बनलाय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:43+5:302021-09-18T04:34:43+5:30

चिपळूण : तालुक्यातील गणेशखिंड-सावर्डे-दुर्गवाडी तळवडे रस्त्यावरील डेरवण हॉस्पिटल परिसरातील पुलाच्या पिलरचा पाया ढासळला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ...

The Dervan Bridge has become dangerous | डेरवण पूल बनलाय धोकादायक

डेरवण पूल बनलाय धोकादायक

चिपळूण : तालुक्यातील गणेशखिंड-सावर्डे-दुर्गवाडी तळवडे रस्त्यावरील डेरवण हॉस्पिटल परिसरातील पुलाच्या पिलरचा पाया ढासळला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सद्यस्थितीत या पुलावरील वाहतूक कुडपमार्गे वळविण्यात आली आहे.

चिपळूण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत डेरवण येथील जुना पूल खचल्याने व त्याचा काही भाग ढासळल्याने तो धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बससेवेसह अन्य वाहतूक बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात धाव घेत कुडपमार्गे वाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच या पुलाची तातडीने डागडुजी करण्याचीही मागणी केली होती.

संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन शुक्रवारपासून या पुलाच्या एका पिलरची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे १ गुरुवारपासून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक कुडपमार्गे सुरु ठेवण्यात येणार आहे.

Web Title: The Dervan Bridge has become dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.