शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवरूख आगार व्यवस्थाकाचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल न केल्याने महिलांचा पोलिस स्थानकातच ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:29 IST

देवरूख : प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या देवरूख आगार व्यवस्थापक सागर गाडे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व सर्वपक्षीय महिलांनी ...

देवरूख : प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या देवरूख आगार व्यवस्थापक सागर गाडे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व सर्वपक्षीय महिलांनी देवरुख पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही त्यांच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसह, महिलांनी देवरुख पोलीस स्थानकात आज, शुक्रवारी  ठिय्या आंदोलन केले.देवरुख आगार प्रमुख गाडे यांनी आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधाने केली होती. याचा व्हिडीओ देखील देवरुख पोलिसांना देण्यात आला होता. त्यांचे निलंबन व्हावे अशी मागणी करत तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी निवेदने देत पत्रकार परिषद घेतली होती. यानंतर देवरूख पोलीस स्थानकात सर्वपक्षीय महिलांनी   निवेदन दिले होते. याला पंधरा दिवस होऊन गेले आणि आगार प्रमुख हे रजेवरून सेवेत हजर झाले. 

त्यांच्या वर काहीच कारवाई न झाल्याने भाजपसह सर्व पक्षीय कार्यकर्ते संतापले. या‌वेळी संतप्त महिलांनी दुपारच्या देवरूख पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस स्थानकात ठिय्या मांडून राहणार अशी,  भुमिका घेतली. आक्रमक झालेल्या महिलांना शांत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. नंतर वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर २ तासांनी तक्रार घेण्यात आली. गाडे यांनी काही ठराविक समाजाविषयी वक्तव्य केल्याने त्यांच्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि कॉंग्रेस अध्यक्षा यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधाने केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तर कारवाई न झाल्यामुळेच  सर्वांनी पोलिस स्थानकात शुक्रवारी धडक दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी