डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:34+5:302021-09-02T05:06:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, लोह, तसेच ९० टक्के पाणी असलेल्या ड्रॅगन फ्रूटला ...

डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, लोह, तसेच ९० टक्के पाणी असलेल्या ड्रॅगन फ्रूटला वाढती मागणी आहे. डेंग्यूमध्ये हाडे कमजोर होतात, रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. मात्र या फळाच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारकशक्ती वाढत असल्याने अन्य फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटचा खप सर्वाधिक आहे.
- देशी-विदेशी सफरचंदाची आवक बाजारात सुरू झाली असून देशी सफरचंद अधिक आहे.
- देशी सफरचंद ६० ते १०० रुपये तर विदेशी सफरचंद १५० ते २५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे
- देशी सफरचंदाची आवक वाढली असून, दर घटले आहेत. विदेशी सफरचंदाचे दर ‘जैसे-थे’ आहेत.
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
फायबर असल्याने पोट साफ राहते. या फळामुळे दात वा हाडे मजबूत होतात. ‘क’ जीवनसत्त्व मुबलक असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. डेंग्यूमुळे कमजोर झालेली हाडे मजबूत होण्यास मदत होते. रक्त पुरवठा नीट होतो, कोलेस्टेराॅल कमी करते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटसाठी विशेष मागणी आहे.
अन्य फळांच्या तुलनेत मागणी
अन्य फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूटचे दर सर्वाधिक आहेत. मात्र आरोग्यासाठी पोषक घटक या फळात असल्यामुळे अन्य फळांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रूट फळाला मागणी अधिक आहे. कोरोना तसेच डेंग्यूमुळे शरीरातील पेशी कमी होत असल्याने रुग्णांना ड्रॅगन फ्रूट सेवनाचा सल्ला दिला जातो. शरीर निरोगी बनविण्यासाठी या फळाचे सेवन केले जात आहे.
ड्रॅगनफ्रूटसह, किवी, पपईसाठी वाढती मागणी आहे.
- राजेंद्र सोनार, रत्नागिरी