शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटातील खचलेले काँक्रीटीकरण तोडण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:02 IST

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता. परंतु दुसऱ्या लेन ...

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी रस्ता खचून धोकादायक बनला होता. परंतु दुसऱ्या लेन वरील खडक तोडण्यासाठी बराच दिवस गेल्याने दुरुस्तीचे लांबणीवर पडले होते. मात्र खचलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. एकीकडे दरडीची भीती, तर दुसरीकडे खचलेल्या रस्त्याचा धोका निर्माण झाला होता. आता खचलेले काँक्रीटीकरण ब्रेकरने तोडले जात आहे. त्याठिकाणी लवकरच नव्याने काँक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे.   मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा वाढल्याने या ठिकाणच्या कामातील गुंता वाढत गेला. परीणामी परशुराम घाटातील काम अनेक महिने स्थगित ठेवण्यात आले होते. प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता. या घाटातील अतिशय अवघड काम चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. कल्याण टोलवेज कंपनी मार्फत हे काम केले जात आहे. मात्र या कंपनीमार्फत दरडीच्या बाजूने केलेले काँक्रीटीकर पहिल्याच पावसात खचले होते. गत वर्षी परशुराम घाटात ५ ते ६ वेळा दरड कोसळली होती. मात्र मोठ्या वळणावर रस्ता खचला असून तेथून जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक सुरु आहे. याच दरम्यान पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पायथ्यालगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच तेथील सहा घरांना फटका बसला. मात्र अजूनही हा धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूस मोठी वस्ती असून या घरांसाठी दिवसेंदिवस धोका अजूनही तळलेला  नाही. त्यामुळे नव्याने करण्यात येणारे काँक्रीटीकरण मजबुत करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक