शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राजापुरातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:55 IST

कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील महत्वपूर्ण अशा राजापूर रोड रेल्वेस्थानकात जनशताब्दीसह मंगला एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांना थांबे मिळावेत. तसेच या स्थानकातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, यासाठी राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत व त्यांचे स्वीय सहाय्यक आदीनाथ कपाळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदन दिले.

ठळक मुद्देराजापुरातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, रेल्वेमंत्र्यांकडे मागणी राजापूर रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत निवेदन

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील महत्वपूर्ण अशा राजापूर रोड रेल्वेस्थानकात जनशताब्दीसह मंगला एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांना थांबे मिळावेत. तसेच या स्थानकातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, यासाठी राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत व त्यांचे स्वीय सहाय्यक आदीनाथ कपाळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदन दिले.

याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून राजापूर स्थानकात गाड्यांना दिला जाणारा थांबा व वाढीव कोटा याबाबतची मागणी केली आहे.याबाबत पंचक्रोशी विकास समितीतर्फे माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक व तुळसवडे गावचे सुपुत्र आदिनाथ कपाळे उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील हे महत्वपूर्ण रेल्वेस्थानक असून, तेथे कोकणकन्या, मांडवी व तुतारीसह दोन पॅसेंजर गाड्या थांबतात. याव्यतिरीक्त अन्य गाड्यांना थांबे मिळत नसल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वंचित राहावे लागत आहे.या मार्गावरून दक्षिणेकडे गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाळूसह आंध्रप्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांकडे जाणारे प्रवासी प्रवास करतात. सध्या रत्नागिरी स्थानक हीच एकमेव सोय असून, चिपळूण, खेड आदी स्थानकात काही गाड्या नियमित किंवा क्रॉसिंगच्या निमित्ताने थांबतात. केवळ राजापूर स्थानकातच दूर पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे या स्थानकात लांब पल्ल्याच्या मंगला लक्षद्वीप, नेत्रावती, केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मंगळुरू, मत्स्यगंधा, करमाळी व नेत्रावती या गाड्यांना थांबे दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राजापूर स्थानकात सध्या सात जागांचा कोटा असून, त्यामध्ये वाढ केली जावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.पाहणी करणारहे निवेदन स्वीकारल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी राजापूर रोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून थांबा मिळणेबाबत आणि तिकीट कोटा वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यावेळी दिले. यापूर्वीही पंचक्रोशी विकास समिती, राजापूर-मुंबईचे एक शिष्टमंडळ सेंट्रल रेल्वेचे असिस्टंट सेक्रेटरी उमंग दुबे यांना याचसंदर्भात भेटले होते. त्यांनीदेखील याबाबत सकारात्मकता दाखवली होती.प्रवाशांची गैरसोयकोकण रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याचा थांबा असणाऱ्या गाड्यांना रत्नागिरीनंतर कणकवली किंवा कुडाळला थांबा असल्याने या मार्गावरील प्रवाशांना खूप धावपळ करावी लागते. राजापूर, विलवडे स्थानिक पट्ट्यातील प्रवाशांची गैरसोय होत असते. अनेकदा मुंबईहून कोकणात येणारे किंवा मुंबईकडे जाणारे प्रवासी या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करु इच्छीतात. मात्र, इथे त्या गाड्यांना थांबे नाहीत. 

 

टॅग्स :railwayरेल्वेRatnagiriरत्नागिरी