नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:31+5:302021-08-22T04:34:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून दि. २० ऑगस्ट ...

नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासात दिरंगाई
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी झाला. या घटनेला २० ऑगस्ट राेजी आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या निर्घुण खुनाच्या तपासात होणाऱ्या दिरंगाईबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मंडणगड शाखेतर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली. या खुनाचा तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी शाखेतर्फे करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मंडणगड तालुका शाखेतर्फे कार्याध्यक्ष विजय पोटफोडे, सचिव श्रीकांत जाधव यांनी मंडणगडचे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर व पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांना निवेदन दिले. यावेळी विजय पोटफोडे यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबविण्यासाठी कडक तातडीच्या कायद्याची गरज व्यक्त केली. तसेच या खुनाचा तातडीने तपास लावून गुन्हेगारांना शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.