‘स्वर्गहरण’च्या प्रयोगात कमतरता

By Admin | Updated: February 6, 2015 00:45 IST2015-02-06T00:04:52+5:302015-02-06T00:45:45+5:30

राज्य नाट्य स्पर्धा : निराशाजनक कामगिरी

Deficiency in the use of 'heaven' | ‘स्वर्गहरण’च्या प्रयोगात कमतरता

‘स्वर्गहरण’च्या प्रयोगात कमतरता

संगीत राज्य नाट्य स्पर्धेतील अठरावे व शेवटचे नाटक सादर झाले. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण, ता. कोपरगाव, अहमदनगर संस्थेच्या नाट्य विभागाकडून संगीत ‘स्वर्गहरण’ या नाटकाचा प्रयोग सादर झाला.
पांडुरंग घांग्रेकर लिखित या नाटकात यमाच्या दुतांच्या समस्या, कोण श्रेष्ठ? माणूस, वनस्पती की प्राणी, या विषयाचे कथानक, नाटक अगदी माफक नेपथ्यावर सादर करण्यात आले. कथानकातील प्रवेशांचा एकमेकांशी संबंध लागत नव्हता. संगीताची बाजू अतिशय लंगडी होती. नाट्यसंगीत व संगीत नाटक म्हणजे काय? याचा अभ्यासच सदरकर्त्यांनी केलेला नाही.
सदर संघाची संगीत नाटकाची संकल्पनाच पूर्णपणे चुकीची होती. अशुध्द शब्दोच्चार, फिल्मी अंगाची भावगीते, न कळणारे, काहीसे वगनाट्याकडे झुकणारे सादरीकरण यामुळे स्पर्धेचा शेवट निराश करणारा ठरला. या नाटकामुळे परीक्षकांच्या सहनशीलतेचा अंत बघितला गेल्याची प्रतिक्रिया रसिकांतून उमटली. संगीत नाटकाचा पाच वर्षे अभ्यास करावा, दर्जेदार संघाची संगीत नाटके बघावी, आत्मपरीक्षण करावे, नंतरच स्पर्धेत भाग घ्यावा, असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले.

राज्य नाट्य -स्पर्धा

Web Title: Deficiency in the use of 'heaven'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.