जिल्ह्यातील लोकसंख्येचा वृद्धीदर होतोय कमी
By Admin | Updated: July 11, 2014 00:05 IST2014-07-11T00:00:07+5:302014-07-11T00:05:04+5:30
सजगता वाढली : साक्षरता, मर्यादित कुटुंब संकल्पनेचे यश

जिल्ह्यातील लोकसंख्येचा वृद्धीदर होतोय कमी
शोभना कांबळे- रत्नागिरी . बदलत्या आधुनिक काळानुरूप समाजातही परिवर्तन होऊ लागले आहे. समाज साक्षरतेकडे झपाट्याने जाऊ लागला. मात्र, महागाईचाही आलेख तेवढाच उंचावत असल्याने आर्थिकदृष्टीने समाजातील काही संकल्पनांना छेद देण्याची वेळ आली. त्यातील महत्त्वाची संकल्पना म्हणजे मर्यादित कुटुंब. याबाबत समाजात सजगता वाढल्याने जिल्ह्याच्या लोकसंख्येत घट झाल्याचे चित्र २०११ साली झालेल्या जनगणनेवरून दिसून येते. त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या निर्मितीमुळे अर्थार्जनासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
१९९१ ते २००० या कालावधीत लोकसंख्या वाढीचा वेग ९.८९ टक्के इतका होता. २००१ साली झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ९७ हजार ७७७ इतकी होती. त्यापैकी १५ लाख ०४ हजार ५६८ इतकी लोकसंख्या ग्रामीण भागात होती. शहराची लोकसंख्या १ लाख ९२ हजार २०९ इतकी होती.
गेल्या दहा वर्षात म्हणजेच २००१ ते २०१० या दशकातील लोकसंख्या १६ लाख १५ हजार ०६९ झाली असून, आताचा वृद्धीदर (-) ४.९६ इतका कमी झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोकसंख्येत घट झाली असून, आता १३ लाख ५१ हजार ३४६ इतकी आहे. म्हणजेच लोकसंख्या १,५३,२२२ने घटली आहे. शहरी भागात केवळ २२८३ ने वाढ झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित कुटुंबाची संकल्पना. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे पूर्वी ‘हम दो हमारे दो’ हा विचारही आता बाजुला पडू लागला असून, ‘हम दो हमारा एक’ या विचारांवर आता बरीच दाम्पत्ये ठाम असलेली दिसतात. यात शासनाच्या या संकल्पनेचेही यश मानायला हरकत नाही. तसेच पती-पत्नी दोघेही अर्थार्जन करणारे असल्याने सर्वच दृष्ट्या कुटुंबातील सदस्य संख्या कमी असण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचा परिणामही जिल्ह्यातील लोकसंख्या कमी होण्यावर झाल्याचे दिसून येते. कारण आता अर्थार्जनासाठी इतर ठिकाणी जाण्याची मानसिकता वाढू लागली आहे.
......
१९९१ ते २००० या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ९.८९ इतका होता, तर २००१ ते २०१० या दशकात तो ४.९६ इतका कमी झाला.
तालुका२००१२०११
मंडणगड७०,५९३६२,१२३
दापोली१,९३,४३०१,७८,३४०
खेड१,९४,५१५१,८१,६१५
चिपळूण२,८१,०८१२,७९,१२२
गुहागर१,४२,२५९१,२३,२०९
रत्नागिरी३,०२,२६१३,१९,४४९
संगमेश्वर२,१४,८१९१,९८,३४३
लांजा१,१३,१५३१,०६,९८६
राजापूर १,८४,६६६१,६५,८८२
एकूण१६,९६,७७७ ६,१५,०६९
२००१ सालच्या जनगणनेुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार पुरूषांमागे स्त्रियांची संख्या ११३६ इतकी होती. मात्र, २०११ साली स्त्रियांची संख्या ११२२ इतकी आहे. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १२१९, तर सर्वांत कमी रत्नागिरी तालुक्यात १०५३ इतकी आहे.
२००१ साली झालेल्या जनगणनेवेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या १५,०४,५६८ इतकी होती, तर शहरी भागात १,९२,२०९ इतकी होती. २०११ साली हीच लोकसंख्या ग्रामीण १३,५१,३४६ इतकी झाली आहे, तर शहरी लोकसंख्या १६,५१०६९ इतकी आहे.